तिन्ही मार्गावर ब्लॉक

By Admin | Published: October 12, 2014 01:39 AM2014-10-12T01:39:14+5:302014-10-12T01:39:14+5:30

मध्य रेल्वेच्या ठाणो-कल्याण डाऊन धीम्या मार्गासह हार्बरच्या कुर्ला-मानखुर्द मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक स. 11 ते दु. 3.3क् या वेळेत घेण्यात येईल.

Block on all three roads | तिन्ही मार्गावर ब्लॉक

तिन्ही मार्गावर ब्लॉक

googlenewsNext
>ठाणो :  मध्य रेल्वेच्या ठाणो-कल्याण डाऊन धीम्या मार्गासह हार्बरच्या कुर्ला-मानखुर्द मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक स. 11 ते दु. 3.3क् या वेळेत घेण्यात येईल.
त्या कालावधीत मुलुंडर्पयत धीम्या डाऊन मार्गावरून येणा:या लोकल डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. कळवा ते ठाकुर्ली धीम्या मार्गावरील फलाटांवरची वाहतूक ठप्प राहणार आहे. परिणामी कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, ठाकुर्लीच्या प्रवाशांनी डाऊनमार्गे कल्याण-डोंबिवलीला येऊन त्यानंतर अपमार्गे जाऊन अपेक्षित ठिकाणी जावे, असे आवाहनही रेल्वेने केले आहे. हार्बर मार्गावरील कुर्ला-मानखुर्द मार्गावर अप/डाऊन दिशांवर ब्लॉक असल्याने स. 11 ते दु. 3 या कालावधीत सीएसटी ते बेलापूर/वाशी/पनवेल या ठिकाणी अप/डाऊन दोन्ही दिशांवर गाडय़ा रद्द करण्यात येतील. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी सीएसटी-कुर्ला आणि मानखुर्द-पनवेल तसेच ट्रान्स-हार्बरच्या ठाणो-पनवेल या दोन्ही मार्गावर अप/डाऊन दिशांवर विशेष लोकल धावतील. ब्लॉकच्या कालावधीत मुख्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरून प्रवासाची मुभा असल्याचे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले.
 
सांताक्रूझ-महालक्ष्मी मार्गावरही ब्लॉक : सांताक्रूझ-महालक्ष्मी अप धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 1क्.35 ते दु. 3.35 या कालावधीत जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत गाडय़ा अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. 

Web Title: Block on all three roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.