मुंबई : विद्याविहार ते मशीद स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गासह हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरही भार्इंदर ते वसई रोड दरम्यान जम्बोब्लॉक घेऊन कामे करण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने सांगितले.विद्याविहार ते मशीद स्थानकांदरम्यान रविवारी अप धिम्या मार्गावर सकाळी ११ वाजून २० मिनिटे ते दुपारी ४ वाजून २० मिनिटांपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे धिम्या मार्गावरील वाहतूक अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. प्रवाशांच्या सुविधांसाठी जलद लोकलला अतिरिक्त थांबा देण्यात येईल. यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल फेऱ्या सुमारे १० ते १५ मिनिटे विलंबाने धावणार असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले.हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. परिणामी सीएसएमटी-पनवेल/बेलापूर/वाशी-सीएसएमटी स्थानकांदरम्यान एकही लोकल धावणार नाही.ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवाही सकाळी १० वाजून १२ मिनिटे ते दुपारी ४ वाजून २६ मिनिटांपर्यंत बंद राहणार आहे. दरम्यान, ठाणे-वाशी/नेरूळ आणि सीएसएमटी ते वाशी विशेष लोकल चालविण्यात येतील. पश्चिम रेल्वेवरील भार्इंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप-डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. परिणानी ब्लॉक काळात लोकल फेºया धिम्या मार्गावरून धावणार आहेत.
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 4:56 AM