मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रूळ दुरुस्तीसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते दिवा, तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे. मेगाब्लॉकदरम्यान पनवेल, तसेच कुर्ला स्थानकावर विशेष लोकल धावतील.मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते दिवादरम्यान रविवारी मेगाब्लॉक दरम्यान पनवेल आणि कुर्ला रेल्वे मार्गावर विशेष लोकल सेवा चालविण्यात येणार आहे. सकाळी १०.५४ ते दुपारी ३.४३ वाजेपर्यंत कल्याणहून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल सेवा कल्याण ते ठाणे दरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. ठाणे ते सीएसएमटीदरम्यान लोकल जलद मार्गावरून धावतील. जलद मार्गावरील नियोजित थांब्यांसह मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा या स्थानकांवर थांबविण्यात येतील. सकाळी १०.१६ ते दुपारी २.५४ वाजेपर्यंत सीएसएमटी स्थानकावरून जलद मार्गावरून सुटणाऱ्या लोकल नियोजित थांब्यांसह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा येथे थांबतील. इच्छित स्थानकावर त्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. सीएसएमटीच्या दिशेने येणाºया सर्व मेल, एक्स्प्रेस ३० मिनिटे उशिराने पोहोचतील.पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रविवारी विशेष जम्बोब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकच्या काळात सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत दोन्ही दिशेकडे जाणाºया धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविण्यात येतील. तिन्ही मार्गावरील ब्लॉकमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.>सीएसएमटी ते चुनाभट्टी लोकल फेºया रद्दहार्बर मार्गावर रविवारी सकाळी ११.४० ते सायंकाळी दुपारी ४.१० वाजेपर्यंत सीएसएमटीहून चुनाभट्टी, वांद्रे दिशेकडे, तसेच सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत वांद्रे, चुनाभट्टीहून सीएसएमटी दिशेकडे एकही लोकल धावणार नाही. हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून वडाळा, वाशी, बेलापूर, पनवेल दिशेकडे जाणाºया सर्व लोकल सकाळी ११.३४ ते दुपारी ४.२३ वाजेपर्यंत, तर वडाळा, वाशी, बेलापूर, पनवेलहून सीएसएमटी दिशेकडे सकाळी ९.५३ ते दुपारी २.४४ वाजेपर्यंत जाणाºया सर्व लोकल रद्द केल्या आहेत.याचप्रमाणे, सीएसएमटीहून वांद्रे, गोरेगाव या दिशेकडे सकाळी ९.५६ ते दुपारी ४.१६ वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाही. वांद्रे, अंधेरी, गोरेगावहून सीएसएमटी मार्गही सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ वाजेपर्यंत बंद असेल. मेगाब्लॉकदरम्यान पनवेल आणि कुर्ला रेल्वे मार्गावर विशेष लोकल धावतील. कुर्ला स्थानकावरील फलाट क्रमांक ८ वरून विशेष लोकल चालविण्यात येतील.
उद्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 6:27 AM