मुंबई : मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान जलद मार्गावर ब्लॉक असेल.मुलुंड ते माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर रविवारी सकाळी ११ वाजून १५ मिनिटे ते दुपारी ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत ब्लॉक आहे. या काळात उपनगरीय लोकलसह सर्व मेल-एक्स्प्रेस मुलुंड ते माटुंगा दरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे लोकल फेऱ्या सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११ वाजून १० मिनिटे ते दुपारी ४ वाजून १० मिनिटांपर्यंत ६ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक काळात वाशी-बेलापूर-पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाºया आणि येणाºया लोकल फेºया रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी या मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येणार असून हार्बरवरील प्रवाशांना ट्रान्स हार्बर आणि मुख्य मार्गाने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट व मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी १० वाजून ३५ मिनिटे ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक काळात धिम्या मार्गावरील लोकल फेºया जलद मार्गावरून चालवण्यात येतील. ब्लॉकचा विचार करून प्रवाशांनी प्रवास करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी केले.
तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 5:51 AM