मुंबई : रविवारी, मध्य रेल्वे मार्गावरील विद्याविहार ते ठाणे जलद मार्गावर ब्लॉक आहे. परिणामी, लोकल धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवार-रविवारी रात्रकालीन ब्लॉक असून, या मार्गावर दिवसकालीन ब्लॉक नसेल. हार्बर मार्गावरील लोकल ब्लॉक काळात रद्द करण्यात आल्या आहेत.मध्य रेल्वे मार्गावरील विद्याविहार ते ठाणे कल्याण दिशेकडील जलद मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० पर्यंत ब्लॉक असेल. या दरम्यान सीएसएमटी येथून कल्याण दिशेकडील जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकातून धिम्या मार्गावर धावतील. शीव आणि मुंब्रा स्थानकादरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. मुंब्रा स्थानकानंतर या लोकल दिवा स्थानकापासून जलद मार्गावर धावतील. सीएसएमटीहून चुनाभट्टी/ वांद्रे दिशेकडे जाणाऱ्या लोकल सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत, तर चुनाभट्टी/वांद्रे येथून सीएसएमटी दिशेकडे जाणाºया लोकल सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत रद्द आहेत. सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत सीएसएमटी/वडाळा रोडहून वाशी/ बेलापूर/ पनवेल येथे जाणाºया लोकल, तसेच सकाळी ९.५६ ते सायंकाळी ४.४३पर्यंत सीएसएमटीहून बांद्रा/गोरेगावच्या दिशेने जाणाºया सर्व लोकल रद्द केल्या आहेत.पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत सीएसएमटीकडे जाणाºया, तसेच बांद्रा/गोरगाव येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ४.५८पर्यंत सीएसएमटीच्या दिशेने लोकल नसतील. पनवेल-कुर्ला दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.
मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांवर आज- उद्या घेतला जाणार ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 6:36 AM