चर्चगेट ते मरीन लाईन्सदरम्यान ब्लॉक; शनिवार, रविवारी लोकलच्या वेळापत्रकात बदल
By सचिन लुंगसे | Published: May 9, 2024 07:08 PM2024-05-09T19:08:09+5:302024-05-09T19:09:14+5:30
११ मे रोजी विरार ते चर्चगेटपर्यंत धावणारी ही शेवटची लोकल असेल.
मुंबई : चर्चगेट आणि मरीन लाईन्सदरम्यान वानखेडे फूट ओव्हर ब्रिज (उत्तर)च्या मुख्य गर्डरच्या कामासाठी शनिवार, ११ मे आणि रविवार, १२ मे रोजी मध्यरात्री १:१० ते ४:१० या वेळेत तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे काही लोकलच्या वेळेवर परिणाम होणार आहे. तर, काही लोकलमुंबई सेंट्रल-चर्चगेट दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत.
११ मे रोजीची गाडी क्रमांक ९१०१८ विरार-चर्चगेट लोकल विरारहून २३:४९ वाजता सुटेल आणि मुंबई सेंट्रलपर्यंत धावेल. १२ मे रोजी गाडी क्रमांक ९१०२४ विरार-चर्चगेट लोकल विरारहून ००.०५ वाजता निघेल आणि मुंबई सेंट्रलपर्यंत धावेल. गाडी क्रमांक ९१०१४ बोरीवली-चर्चगेट लोकल बोरीवलीहून ००:१० वाजता निघेल आणि मुंबई सेंट्रलपर्यंत धावेल. गाडी क्रमांक ९१०२० बोरीवली-चर्चगेट लोकल बोरीवलीहून ००:३० वाजता निघेल आणि मुंबई सेंट्रलपर्यंत धावेल.
१२ मे रोजी गाडी क्रमांक ९००११ चर्चगेट-विरार लोकल, चर्चगेटहून ०४.१५ वाजता सुटणार होती, ती मुंबई सेंट्रलवरून ०४.२५ वाजता सुटेल. तसेच गाडी क्रमांक ९००१५ चर्चगेट-बोरिवली लोकल १२ मे रोजी चर्चगेट येथून ०४.१८ वाजता सुटण्याऐवजी मुंबई सेंट्रलवरून ०४.२८ वाजता सुटेल. गाडी क्रमांक ९१०१२ विरार-चर्चगेट लोकल ११ मे रोजी विरारहून २३.३० वाजता सुटेल आणि चर्चगेटला ०१.१० वाजता पोहोचेल. ११ मे रोजी विरार ते चर्चगेटपर्यंत धावणारी ही शेवटची लोकल असेल.