Join us

मध्य, ट्रान्स हार्बर मार्गावर आज ब्लॉक; पश्चिम तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 1:45 AM

रविवारी रेल्वेच्या मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर अभियांत्रिकी कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम आणि हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे पश्चिम आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांची ब्लॉकपासून सुटका झाली आहे.

मुंबई : रविवारी रेल्वेच्या मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर अभियांत्रिकी कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम आणि हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे पश्चिम आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांची ब्लॉकपासून सुटका झाली आहे. मध्य रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा अप धिम्या मार्गावर आणि ठाणे-वाशी/नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे.रविवारी मुलुंड-माटुंगा अप धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते सायंकाळी ४.२० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. ठाणे रेल्वे स्थानकावरून सकाळी १०.४८ पासून ते सायंकाळी ४.०२ वाजेपर्यंत अप धिम्या मार्गावर सुटणाºया सर्व उपनगरीय लोकल मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. सर्व गाड्या ठरलेल्या थांब्यांशिवाय मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव या स्थानकांवरही थांबतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी १०.१६ ते दुपारी २.५४ दरम्यान सुटणाºया डाऊन मार्गावरील जलद गाड्या ठरलेल्या थांब्यांशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्थानकांवर थांबतील. या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा २० मिनिटे उशिराने पोहोचतील. कल्याणवरून सकाळी ११.०४ ते दुपारी ०३.०६ दरम्यान सुटणाºया अप मार्गावरील जलद गाड्या ठरलेल्या थांब्यांशिवाय दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी आणि घाटकोपर या स्थानकांवर थांबतील.प्रवास करण्याची मुभाठाणे-वाशी/नेरूळ अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाण्याहून सकाळी १०.३५ ते दुपारी ०४.०७ दरम्यान वाशी/नेरूळ येथे जाणाºया तसेच वाशी/नेरूळ येथून सकाळी १०.४५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाणे येथे जाणाºया सर्व उपनगरीय लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक काळात ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांना हार्बर मार्गावर प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबई लोकल