Join us

मध्य रेल्वे मार्गावर दिवसा तर पश्चिम रेल्वे मार्गावर रात्री ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 6:55 AM

मुलुंड-माटुंगादरम्यान सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावर ब्लॉक असेल. सकाळी १०.५८ ते दुपारी ४ पर्यंत धिम्या लोकल मुलुंड ते माटुंगादरम्यान जलद मार्गावरून धावतील.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड-माटुंगा स्थानकांदरम्यान सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी ब्लॉक असेल. त्यामुळे धिम्या लोकल जलद मार्गावरून धावतील. पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी-रविवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल.

मुलुंड-माटुंगादरम्यान सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावर ब्लॉक असेल. सकाळी १०.५८ ते दुपारी ४ पर्यंत धिम्या लोकल मुलुंड ते माटुंगादरम्यान जलद मार्गावरून धावतील. या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकांत थांबतील. त्यानंतर या लोकल धिम्या मार्गावरून धावतील.

हार्बर मार्गावरील पनवेल/बेलापूरहून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या लोकल सकाळी ११.०६ ते दुपारी ४.०१ या दरम्यान रद्द केल्या जातील. सीएसएमटीहून बेलापूर/ पनवेल दिशेकडे जाणाºया लोकल सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ या दरम्यान रद्द करण्यात येतील. सकाळी १०.१२ ते दुपारी ३.५३ दरम्यान पनवेलहून ठाणे दिशेकडे जाणारी लोकल सेवा रद्द करण्यात येईल.

सकाळी ११.१४ ते दुपारी ३.२० यादरम्यान ठाण्याहून पनवेलला जाणारी लोकल सेवा रद्द करण्यात येईल. नेरूळ/बेलापूरहून खारकोपरसाठी सुटणाºया लोकल सकाळी ११.०२ ते दुपारी ३.२२ पर्यंत रद्द करण्यात येतील. खारकोपरहून नेरूळ/बेलापूरसाठी सुटणाºया लोकल सकाळी ११.३० ते दुपारी ४.१६ पर्यंत रद्द करण्यात येतील. यादरम्यान पनवेल ते अंधेरी लोकल सेवा रद्द असेल.पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा रोड ते मुंबई सेंट्रलदरम्यान १८-१९ जानेवारी रोजी ब्लॉक घेण्यात येईल. १८ जानेवारी रोजी रात्री ११.४५ ते पहाटे ३.४५ पर्यंत ब्लॉक असेल. यादरम्यान चर्चगेट दिशेकडे जाणाºया जलद लोकल सांताक्रुझ ते चर्चगेट दरम्यान धिम्या मार्गावर धावतील. रविवारी कोणताही दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार नाही, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. ब्लॉकच्या कालावधी लक्षात घेऊन प्रवाशांनी प्रवास करावा, अशी सूचना रेल्वेने केली आहे.

टॅग्स :रेल्वे