मेगा ब्लॉकने प्रवासी ‘ब्लॉक’
By admin | Published: February 13, 2017 05:28 AM2017-02-13T05:28:15+5:302017-02-13T05:28:15+5:30
ठाणे-कल्याणदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते ४.२० दरम्यान ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे ठाण्याकडून कल्याणकडे
ठाणे : ठाणे-कल्याणदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते ४.२० दरम्यान ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे ठाण्याकडून कल्याणकडे जाणारी एकही धिमी लोकल न सुटल्याने कळवा-मुंब्रा आणि कोपर येथील प्रवाशांचे हाल झाले.
ठाण्यावरून कळव्याकडे आणि मुंब्य्रातील दिव्यात जाण्यासाठी प्रवाशांनी चक्क टॅ्रकवरून प्रवास केला. ब्लॉकदरम्यान, डाऊन धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवल्या होत्या. त्यामुळे कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकात एकही लोकल न थांबल्याने येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिवा, डोंबिवली आणि कल्याण स्थानकापर्यंत जलद लोकलने प्रवास करीत तेथून ठाण्याकडे येणाऱ्या धिम्या लोकलने स्थानक गाठावे लागले. त्यामुळे, प्रवाशांचे हाल झाले. शिवाय, उद्घोषणाही व्यवस्थित होत नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. रविवार असल्याने अनेक जण कुटुंबासह बाहेर पडले. मात्र, गाड्यांच्या या गोंधळामुळे हा प्रवास त्रासाचा झाला. (प्रतिनिधी)