मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर १२ ते २० मार्चदरम्यान ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 05:17 AM2019-03-09T05:17:34+5:302019-03-09T05:17:49+5:30
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने १२ ते २० मार्चदरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ठरावीक वेळेसाठी रोड ब्लॉकची घोषणा केली आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने १२ ते २० मार्चदरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ठरावीक वेळेसाठी रोड ब्लॉकची घोषणा केली आहे. खंडाळा बोगदा (पुणे व मुंबई लेन) येथे दरडीचे दगड काढण्याचे काम करण्यात येणार असल्याने, हा ब्लॉक घेण्यात येईल.
महामार्ग पोलिसांच्या माहितीनुसार, येथील ४६.७१० ते ४६.५७९ किमी. दरम्यान ढिले झालेले दरडीचे दगड काढणे प्रलंबित आहे. त्यासाठी १२ ते २० मार्चदरम्यान रोज पाच ब्लॉक घेण्यात येतील. काम करताना, या मार्गावरील वाहतूक प्रत्येकी १५ मिनिटे पूर्ण बंद असेल. १५ मार्चला दुपारी ३.१५ ते १८ मार्च सकाळी १२ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत सुरू असेल.
>या वेळेत वाहतूक बंद
सकाळी १० ते १०.१५
सकाळी ११ ते ११.१५
सकाळी १२ ते दुपारी १२.१५
दुपारी २ ते २.१५
दुपारी ३ ते ३.१५