मुंबई : उपनगरीय रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी रविवार,१० डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावर दुरुस्ती करण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेचा रात्रकालीन ब्लॉक असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वेकुठे : ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर कधी - सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यतपरिणाम - ब्लॉक दरम्यान ठाणे ते कल्याण दरम्यानची जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरुन वळविण्यात येणार आहे. परिणामी या मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. तसेच सीएसएमटी-दादर स्थानकातून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या मेल- एक्सप्रेस ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या -सहाव्या रेल्वे मार्गावरुन चालविण्यात येणार आहे.
हार्बर रेल्वेकुठे - हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान कधी - सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यत परिणाम -यादरम्यान कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यानची लोकल सेवा पुर्णपणे बंद राहणार आहे. या मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान स्पेशल लोकल चालविण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यत ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी-नेरुळ दरम्यान प्रवास करण्याची परवानगी आहे.पश्चिम रेल्वेकुठे - मुंबई सेंट्रल ते माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावरकधी - शनिवारी रात्री ११ ते रविवारी पहाटे ४ वाजेपर्यत परिणाम - ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील लोकल सांताक्रुझ ते चर्चगेट दरम्यान धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे.