रविवारी ब्लॉक! रेल्वे गाड्या १५ मिनिटे उशिराने धावणार

By सचिन लुंगसे | Published: May 17, 2024 06:12 PM2024-05-17T18:12:33+5:302024-05-17T18:13:29+5:30

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Block on Sunday Trains will run 15 minutes late | रविवारी ब्लॉक! रेल्वे गाड्या १५ मिनिटे उशिराने धावणार

रविवारी ब्लॉक! रेल्वे गाड्या १५ मिनिटे उशिराने धावणार

मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत तर हार्बरवर अप आणि डाऊन मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.

सीएसएमटी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. ठाण्यापुढे जाणाऱ्या जलद गाड्या पुन्हा मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ या वेळेत  सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड येथे अप धीम्या लाइनवर वळविण्यात येतील. पुन्हा माटुंगा येथील अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या १५ मिनिटे विलंबाने धावतील.

सीएसएमटी येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत  वाशी / बेलापूर / पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या आणि पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी - कुर्ला आणि पनवेल - वाशी या भागांवर विशेष गाड्या धावतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ या कालावधीतल ठाणे - वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी आहे.
 
डाउन धीमी लाइन
१) ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल बदलापूर आहे. सीएसएमटी येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल.
२) ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर आहे. सीएसएमटी येथून दुपारी ३.३९ वाजता सुटेल.
अप धीमी लाइन
१) ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल अंबरनाथ आहे. सकाळी ११.१० वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
२) ब्लॉकनंतर पहिली लोकल आसनगाव आहे. सीएसएमटी येथे ४.४४ वाजता पोहोचेल.
 
डाऊन हार्बर लाईन
१) ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल आहे. सीएसएमटी येथून सकाळी १०.१८ वाजता सुटेल.
२) ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल आहे. सीएसएमटी येथून दुपारी ३.४४ वाजता सुटेल.
अप हार्बर मार्ग
१) सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०.०५ वाजता सुटेल.
२) सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३.४५ वाजता सुटेल.

Web Title: Block on Sunday Trains will run 15 minutes late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.