मुंबई : मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला असून, पश्चिम रेल्वेमार्गावर जम्बो ब्लॉक असेल. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा या स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. रविवारी सकाळी १० वाजून ३७ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ३१ मिनिटांपर्यंत ठाणे स्थानकावरून अप धिम्या मार्गावरील सर्व लोकल वाहतूक मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन या स्थानकांवर थांबविण्यात येणार असून माटुंगावरून अप धिम्या मार्गावर धावतील.
सकाळी ११ वाजून ४ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ६ मिनिटांपर्यंत कल्याण स्थानकावरून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल संबंधित स्थानक थांब्यासह दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. तर, सकाळी १० वाजून १६ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून ५४ मिनिटांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून सुटणाºया डाऊन जलद मार्गावरील लोकल संबंधित थांब्यासह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकावर थांबतील. त्यामुळे त्या नियोजित वेळापत्रकापेक्षा पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावतील.हार्बर मार्गावर विशेष लोकलहार्बर रेल्वेच्या कुर्ला ते वाशी या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येईल. सकाळी १० वाजून ३४ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ०८ मिनिटांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून पनवेल, बेलापूर आणि वाशी या स्थानकांसाठी एकही लोकल धावणार नाही. तर, सकाळी १० वाजून २१ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर, वाशीवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सुटणाºया अप मार्गावरील सर्व लोकल फेºया रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉककाळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी - पनवेल स्थानकांदरम्यान विशेष लोकल धावतील.बोरीवली-भार्इंदर स्थानकांदरम्यान ४ तासांचा ब्लॉकपश्चिम रेल्वेच्या बोरीवली ते भार्इंदर स्थानकांदरम्यान रविवारी अप आणि डाऊन जलद मार्गावर चार तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. बोरीवली ते भार्इंदर स्थानकांदरम्यान सिग्नलिंग, रेल्वे रूळ दुरुस्ती, ओव्हरहेड वायर दुरुस्ती यासाठी सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. ब्लॉकदरम्यान सर्व अप जलद मार्गावरील लोकल अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. तर, विरार-वसई रोड ते बोरीवली सर्व डाऊन जलद लोकल डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.