मुंबई : मध्य रेल्वेवर मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या डाउन धिम्या मार्गाच्या कामांसाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर रुळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे, तर पालघर स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येईल.मुंब्रा ते कळवा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रूळ जोडणीबाबतचे काम करण्यात येईल. यामुळे रविवारी १० तास अप धिम्या मार्गावरील वाहतूक अप जलद मार्गावर वळविण्यात येईल. अप आणि डाउन मार्गावरील जलद लोकल फेऱ्यांना नियमित थांब्यासह अतिरिक्त थांबा देण्यात येईल. ब्लॉक काळात कळवा आणि मुंब्रा स्थानकावरील प्रवाशांना ठाणे-दिवा स्थानकातून प्रवास करण्याची मुभा मध्य रेल्वेने दिली आहे.चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रविवारी अप आणि डाउन जलद मार्गांवर सकाळी १० वाजून ३५ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. यामुळे ब्लॉक काळातील लोकल फेºया अप आणि डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.पालघर स्थानकात पुलाच्या गर्डरचे कामपश्चिम रेल्वेवरील पालघर स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर उभारणीसाठी सकाळी १० वाजून १५ मिनिटे ते दुपारी १ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या काळात अप आणि डाउन दोन्ही दिशेकडील लोकल फेºया रद्द करण्यात येतील.
पनवेल स्थानकातून विशेष लोकलछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे (हार्बर मार्ग) स्थानकावर सकाळी ११ वाजून ४० मिनिटे ते ४ वाजून १० मिनिटांपर्यंत ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ब्लॉक काळात डाउन हार्बर मार्गावरून एकही लोकल धावणार नाही. प्रवाशांच्या सोईसाठी पनवेल आणि कुर्ला (फलाट क्रमांक ८) स्थानकातून विशेष लोकल फेºया चालविण्यात येतील.