Join us

बेस्टच्या संपकाळातही रेल्वेचा ‘ब्लॉक’; प्रवाशांचे होणार हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 6:06 AM

रविवारी कर्जत-खोपोली लोकल सेवा रद्द : चर्चगेट ते मुंबई सेंट्रलवर जम्बो ब्लॉक; लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या केल्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील बदलापूर ते कर्जत या स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या मार्गांवर पायाभूत सुविधांच्या कामासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

रविवारी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपर्यंत कर्जत दिशेकडे जाणाºया लोकल आणि सकाळी १० वाजून ४५ मिनिटांपासून ते ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत सीएसएमटी दिशेकडे जाणाºया लोकल सेवेवर याचा परिणाम होणार आहे.दोन टनचे आॅफलोडेड पोर्टल आणि एंकर संरचना हटविण्यात येणार आहे. शेलू स्थानकावर ६ मीटर लांबीचा पादचारी पुलांचा गर्डर उभारण्यात येणार आहे. भिवपुरी रोड स्थानकावर पादचारी पुलांचे गर्डर क्रेन आणि लॉचिंग करण्यात येणार आहे. यासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे.

सीएसएमटीवरून सकाळी ९ वाजून १ मिनिटांची कर्जत लोकल अंबरनाथ स्थानकापर्यंत चालविण्यात येईल. सीएसएमटीवरून सकाळी ९ वाजून ३८ मिनिटांची, सकाळी १० वाजूून ३६ मिनिटांची, सकाळी ११ वाजून १५ मिनिटांची आणि दुपारी १ वाजून १३ मिनिटांची कर्जत लोकल बदलापूरपर्यंत चालविण्यात येणार आहे. ठाण्यावरून सकाळी १० वाजून ३८ मिनिटांची आणि १२ वाजून ५ मिनिटांनी सुटणारी ठाणे-कर्जत लोकल बदलापूरपर्यंत चालविण्यात येणार आहे. सीएसएमटीवरून दुपारी १२ वाजून २२ मिनिटांनी सुटणारी खोपोली लोकल बदलापूर स्थानकापर्यंत चालविण्यातयेईल.कर्जतवरून सीएसएमटीला जाणारी १० वाजून ४५ मिनिटांची, ११ वाजून १९ मिनिटांची, १२ वाजून १ मिनिटांची आणि दुपारी १ वाजून १ मिनिटांची लोकल बदलापूर स्थानकातून चालविण्यात येणार आहे. कर्जतवरून सीएसएमटीला जाणारी दुपारी १ वाजून १ मिनिटांची लोकल अंबरनाथ स्थानकावरून चालविण्यात येणार आहे. कर्जतवरून ठाण्याला जाणारी दुपारी १ वाजून २७ मिनिटांची लोकल बदलापूरवरून चालविण्यात येणार आहे.रद्द केलेल्या मेल, एक्स्प्रेसरविवारी धावणारी पुणे-कर्जत-पुणे सवारी गाडी क्रमांक ५१३१८/५१३१७ आणि गाडी क्रमांक ११००९/११०१० सीएसएमटी मुंबई-पुणे-सीएसएमटीमुंबई सिंहगड एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.‘परे’वर जम्बो ब्लॉकपश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. रविवारी सकाळी १० वाजून ३५ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत चर्चगेट ते मुंबई सेंट्रलवरील धिम्या मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. यामध्ये काही लोकल रद्द केल्या आहेत.या गाड्यांच्या मार्गात बदलशनिवारी चालविण्यात येणारी गाडी क्रमांक १७०३२ हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११०४२ चेन्नई-मुंबई एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११०१४ कोयम्बतूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आणि रविवारी चालविण्यात येणारी गाडी क्रमांक १७२२२ लोकमान्य टिळक टर्मिनस-काकीनाडा एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १७०३१ मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस दिवा-पनवेल-कर्जतवरून चालविण्यात येणार आहे. कल्याण स्थानकावर चढणारे आणि उतरणाºया प्रवाशांना दिवा स्थानकावर थांबा दिला आहे. 

टॅग्स :रेल्वेलोकल