पश्चिम द्रुतगती मार्गावर शनिवारी, रविवारी रात्रीच्या वेळेस ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 08:30 PM2019-06-21T20:30:05+5:302019-06-21T20:36:05+5:30

कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे तोडण्यात येणार आहे.

Block on Western Express Highway on Saturday, Sunday night | पश्चिम द्रुतगती मार्गावर शनिवारी, रविवारी रात्रीच्या वेळेस ब्लॉक

पश्चिम द्रुतगती मार्गावर शनिवारी, रविवारी रात्रीच्या वेळेस ब्लॉक

Next
ठळक मुद्देवाहतूक वळवण्यात येणार असल्याने प्रवाशांना काही त्रास होणार नसल्याचे एमएमआरडीएचे सह प्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी सांगितले. आता वाहतूक पोलिसांची परवानगी मिळाल्याने या कामास सुरूवात करण्यात येणार आहे.

मुंबई - बांद्रा पूर्व येथील पादचारी पुलाचा काही भाग सी-लिंक ते बीकेसी उड्डाणपुलाच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे तोडण्यात येणार आहे. या कामासाठी पादचारी पुलाच्या दक्षिणेकडील मार्गिका शनिवारी तर उत्तरेकडील मार्गिका रविवारी रात्री तोडण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाने सांगितले. मात्र वाहतूक वळवण्यात येणार असल्याने प्रवाशांना काही त्रास होणार नसल्याचे एमएमआरडीएचे सह प्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी सांगितले.
पादचारी पुलाच्या दक्षिणेकडील मार्गिका शनिवारी रात्री ११.०० वाजता ते रविवारी सकाळी ५.०० वाजेपर्यंत, तर उत्तरेकडील मार्गिका रविवारी रात्री ११.०० ते सोमवारी सकाळी ५.०० वाजेपर्यंत तोडण्यात येणार आहे. या दरम्यान पश्चिम द्रुतगती मार्गावर ब्लॉक घेण्यासाठी वाहतुक पोलिसांची परवानगी प्राधिकरणाला मिळाली असल्याने प्राधिकरणाने हे काम प्राधान्याने हाती घेतले आहे. या कामासाठी प्राधिकरणातर्फे सुमारे चार कोटी रूपये खर्च होणार आहे. ७१४ मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम सप्टेंबर २०१९ मध्ये पूर्ण झाल्यावर या पादचारी पुलाच्या दोन्ही मार्गिका पुन्हा नव्याने बांधण्यात येतील.
यापुर्वीच हे काम प्राधिकरणाकडून करण्यात येणार होते, मात्र वाहतुक पोलिसांची परवानगी मिळत नसल्याने हे काम रखडले होते. आता वाहतूक पोलिसांची परवानगी मिळाल्याने या कामास सुरूवात करण्यात येणार आहे. एमएमआरडीएला पादचारी पुलाच्या कामाआंतर्गत क्रेनचा वापर करून काही भाग कापून काढावा लागणार आहे. त्यासाठीच दोनवेळा पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक वळवण्याची वेळ वाहतूक विभागावर आली आहे.

Web Title: Block on Western Express Highway on Saturday, Sunday night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.