एका क्लिकवर मिळणार रक्तसाठ्याची माहिती, ‘ई-रक्तकोष’ पोर्टलमुळे रुग्णांच्या नातेवाइकांची थांबणार धावपळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 13:38 IST2025-03-21T13:38:15+5:302025-03-21T13:38:32+5:30

थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल आणि रक्ताशी निगडित इतर आजारांचे रुग्ण आणि त्यांच्या नातलगांची रक्त मिळवण्यासाठीची धावपळ मात्र कमी होणार आहे...

Blood bank information will be available with one click, 'e-Blood Bank' portal will stop the rush of patients' relatives | एका क्लिकवर मिळणार रक्तसाठ्याची माहिती, ‘ई-रक्तकोष’ पोर्टलमुळे रुग्णांच्या नातेवाइकांची थांबणार धावपळ 

एका क्लिकवर मिळणार रक्तसाठ्याची माहिती, ‘ई-रक्तकोष’ पोर्टलमुळे रुग्णांच्या नातेवाइकांची थांबणार धावपळ 

मुंबई :  रुग्ण, रक्तदान शिबिरांचे आयोजक इत्यादींना उपलब्ध रक्तसाठ्याची माहिती सहज मिळावी, यासाठी केंद्र आरोग्य मंत्रालयाने शासनाने ‘ई-रक्तकोष पोर्टल’ विकसित केले आहे. या पोर्टलवर रक्ताविषयीची सर्व माहिती एका क्लिकवर मिळते. थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल आणि रक्ताशी निगडित इतर आजारांचे रुग्ण आणि त्यांच्या नातलगांची रक्त मिळवण्यासाठीची धावपळ मात्र कमी होणार आहे. 

फरफट थांबणार,  जीव वाचणार 
अनेकदा रुग्णाला वैद्यकीय उपचारांचा भाग म्हणून रक्ताची गरज भासते. रुग्णालयात रुग्णाला हवा असणारा रक्तसाठा उपलब्ध नसल्यामुळे नातेवाइकांना रक्त आणण्यासाठी सांगितले जाते. त्यावेळी नातेवाइकांना रक्त मिळविण्यासाठी भटकावे लागते. अनेक रक्तपेढ्याचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र, आता या ई- रक्तकोषमुळे रुग्णाला हवे असणारे रक्त कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहे, याची माहिती तत्काळ मिळणार आहे. 

रक्त संकलनात महाराष्ट्र प्रथम 
रक्त संकलनात महाराष्ट्र देशात पहिला आहे. राज्यात २०२४ मध्ये २१ लाख दात्यांनी रक्तदान केले. त्यातून मोठ्या प्रमाणात रेड ब्लड सेल, प्लेटलेट कॉन्सन्ट्रेट, फ्रेश फ्रोजन प्लाझ्मा आदी रक्तघटक संकलित करण्यात आले. 
राज्य रक्त संकलन परिषदेने 
हे रक्त व रक्त घटकाच्या 
प्रोसेसिंग चार्जेसचे दर निश्चित केलेले आहेत.

पोर्टलच्या होमपेजवर अशी आहे माहिती  
पोर्टलच्या होमपेजवर किती रक्तदात्यांची आतापर्यंत नावनोंदणी झाली आहे, किती रक्तसंकलन झाले याची माहिती तसेच रक्त शोधण्यासाठी एक खिडकी दिली आहे. तेथे कोणत्या गटाचे रक्त, रक्तघटक कोणत्या शहरात, रक्तपेढीत उपलब्ध आहेत हे समजते.  
रक्तदान आयोजकांनाही येथे नोंदणी करणे शक्य आहे. राज्यात, देशात किती रक्तपेढ्या उपलब्ध आहेत, याची नोंदही आहे.  

३९५  एवढ्या रक्तपेढ्या, रक्तकेंद्राचे जाळे  हे राज्यामध्ये शासकीय, निमशासकीय, ट्रस्ट, काॅर्पोरेशन, प्रायव्हेट असे मिळून आहे. ई रक्तकोष  पोर्टलवर रक्तदान शिबिरांचीही नोंदणी करता येणार आहे.  रुग्णाला हव्या असणाऱ्या रक्ताची माहिती, आजूबाजूच्या शहरात उपलब्ध आहे का, याची माहितीही  उपलब्ध होणार आहे. 

Web Title: Blood bank information will be available with one click, 'e-Blood Bank' portal will stop the rush of patients' relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.