...तर रक्तपेढ्यांची मान्यता येणार धोक्यात

By Admin | Published: August 17, 2016 03:39 AM2016-08-17T03:39:45+5:302016-08-17T03:39:45+5:30

नवीन मोबाइल ब्लड बँक व्हॅनची खरेदी न केल्यास रक्तपेढ्यांची मान्यताच अन्न व औषध प्रशासनाकडून रद्द होण्याचा धोका असल्याने, अखेर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे़

... blood banks can be recognized in danger | ...तर रक्तपेढ्यांची मान्यता येणार धोक्यात

...तर रक्तपेढ्यांची मान्यता येणार धोक्यात

googlenewsNext

मुंबई : नवीन मोबाइल ब्लड बँक व्हॅनची खरेदी न केल्यास रक्तपेढ्यांची मान्यताच अन्न व औषध प्रशासनाकडून रद्द होण्याचा धोका असल्याने, अखेर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे़ त्यानुसार, अशा चार व्हॅन तातडीने खरेदी करण्यासाठी पालिकेची धावपळ सुरू आहे़
रुग्णालयांमार्फत विविध ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदात्यांकडून प्राप्त झालेले रक्त रक्तपेढीमध्ये जमा करण्यात येत असते़ मात्र, सध्या अस्तित्वात असलेल्या ब्लॅड बँक व्हॅनची मुदत ३१ मे २०१५ रोजी संपुष्टात आली आहे़ उच्च न्यायालयाने यास मुदतवाढ देऊन ३१ डिसेंबरपर्यंत २०१५ पर्यंतची वेळ दिली होती़ मात्र, ही मुदत संपून नऊ महिने उलटले, तरी ब्लड व्हॅन खरेदीबाबत महापालिका सुस्त होती़
अखेर अन्न व औषध प्रशासनाकडूनच दंडुका पडल्यानंतर पालिकेची झोप उडाली आहे़ मोबाइल ब्लड बँक व्हॅन खरेदी न केल्यास, रक्तपेढ्यांची मान्यताच रद्द होण्याचा धोका निर्माण झाला आहे़ रक्तपेढ्यांची मान्यता रद्द होणे ही बाब पालिकेसाठी शरमेची ठरणार असल्याने या व्हॅनच्या खरेदीसाठी धावपळ सुरू आहे़ याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावार तत्काळ मंजुरीसाठी आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: ... blood banks can be recognized in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.