Join us

वडाळा येथील रक्तदान शिबिरात ४१ रक्तदात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:06 AM

मुंबई : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमतच्या वतीने राज्यभर रक्तदान ...

मुंबई : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमतच्या वतीने राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १ जुलै ते १६ जुलै या कालावधीत राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवारी लोकमत, रोटरॅक्ट क्लब ऑफ वडाळा ईस्ट, रोटरॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे अपटाउन व रोटरी कम्युनिटी कॉर्प्स ऑफ कोकरी आगार यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वडाळ्याच्या भक्ती पार्क येथील ओल्ड क्लब हाउस येथे आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात एकूण ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराला एस.एल. रहेजा रुग्णालय व फोर्टिस ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले. यावेळी स्वर्गीय रेखा जयेंद्र संघवी यांचे स्मरण करण्यात आले. राज्यात भासत असलेला रक्ताचा तुटवडा भरून निघावा, तसेच गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे, यासाठी ‘नातं रक्ताचं नातं जिव्हाळ्याचं’ या मोहिमेंतर्गत हे रक्तदान शिबिर सर्वत्र राबविण्यात येत आहे.