येत्या काळात रक्ताअभावी कोणत्याही रुग्णाला उपचारात अडचण येऊ नये यासाठी स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमतच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या रक्तदान शिबिराला महामुंबईतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. देशभरातून कौतुक होत आहे. ‘नातं रक्ताचं नातं जिव्हाळ्याचं’ या मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
रक्तदान शिबिराची ठिकाणे
तारीख /उपनगर/ सहयोगी संस्था / पत्ता / वेळ
२२ जुलै - सायन : आमदार प्रसाद लाड विधान परिषद महाराष्ट्र राज्य, भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, अध्यक्ष मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान / शॉप नंबर ४, तळमजला, प्लॉट नंबर ९४,९५ रुपम बिल्डिंग, हनुमान हॉटेलजवळ, सायन मार्ग क्रमांक आठ, सायन सर्कल / १० ते ४
२२ जुलै - खालापूर : हायवे पोलीस आणि आयआरबी स्टाफ / आयआरबी बिल्डिंग, खालापूर टोल नाका, सावरोली, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, तळ खालापूर, रायगड / ९ ते २
--------------
२४ जुलै - चेंबूर : रोटरॅक्ट क्लब ऑफ देवनार / जनरल एज्युकेशन अकॅडमी, मार्ग क्रमांक १९ चेंबूर गावठाण / १० ते ४
२४ जुलै - परळ : नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एनआरएमयू) / सेंट्रल रेल्वे लोको वर्कशॉप, परळ १२, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ / १० ते ४
---------------
२५ जुलै - मालाड पूर्व : मनोहर राणे शाखाप्रमुख शिवसेना शाखा क्रमांक ३७ / जिजामाता विद्यामंदिर आनंदवाडीसमोर, कुरार गाव, मालाड पूर्व / ९ ते ३
२५ जुलै - विक्रोळी पश्चिम : कच्छ युवक संघ घाटकोपर शाखा / श्री केव्हीओ सेवा समाज हॉल, संभवनाथ जैन देरासर, ट्वीन हाऊस कॉलनी, फायर ब्रिगेडजवळ, पार्कसाइट, विक्रोळी पश्चिम / ९ ते ४
येथे संपर्क साधा
'लोकमत'च्या रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी होणाऱ्या संस्था किंवा संघटनांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी मुंबई महानगर प्रदेशात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी रोनाल्ड डिसोझा यांना ९०८२९९६५८३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
या संकेतस्थळावर नोंदणी करा
http://bit.ly/lokmatblooddonation