‘लोकमत’च्या वतीने एक जुलैपासून रक्तदान शिबिर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:06 AM2021-06-30T04:06:31+5:302021-06-30T04:06:31+5:30

मुंबई : कोरोनामुळे आपल्या आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आलेला आहे. अशातच राज्यात रक्ताचा तुटवडा देखील भासत आहे. आगामी काळात ...

Blood donation camp on behalf of 'Lokmat' from July 1! | ‘लोकमत’च्या वतीने एक जुलैपासून रक्तदान शिबिर!

‘लोकमत’च्या वतीने एक जुलैपासून रक्तदान शिबिर!

Next

मुंबई : कोरोनामुळे आपल्या आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आलेला आहे. अशातच राज्यात रक्ताचा तुटवडा देखील भासत आहे. आगामी काळात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केल्याने पुन्हा एकदा रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शस्त्रक्रियांसह इतर उपचारांसाठी रक्ताची गरज भासू शकते. हा रक्ताचा तुटवडा भरून निघावा तसेच गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे, यासाठी लोकमतच्या वतीने १ जुलै ते १६ जुलै या कालावधीत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मुंबईतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची २ जुलै रोजी जयंती आहे. त्याप्रीत्यर्थ ‘नातं रक्ताचं नातं जिव्हाळ्याचं’ या मोहिमेंतर्गत रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबईत अनेक ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात रक्त तुटवड्यामुळे ज्यांना नेहमी रक्ताची गरज भासते अशा थॅलेसीमिया, सिकलसेल रुग्णांची गैरसोय होते. गर्भवती माता व अपघातग्रस्तांना देखील आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासते. अशावेळी रक्तदाता शोधणे व रक्ताचा गट जुळवणे हे अतिशय जिकिरीचे होते. या सर्वांना जीवनदान देण्यासाठी रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे. तरच आपण खऱ्या अर्थाने जीवनदान अर्पण करू शकतो.

शासकीय रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा असल्याने डॉक्टरांना देखील उपचारांमध्ये अनेक अडचणी येत आहेत.

कोरोना महामारीमुळे व लसीकरणामुळे अनेकांना रक्तदानाची इच्छा असूनही मर्यादा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमतने सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे. यात आपला सक्रिय सहभाग नोंदवून रक्तदानाची एक लोकचळवळ उभी रहावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

यांनी करावे रक्तदान

* १८ ते ६० वयोगटातील व्यक्ती

* कोरोना निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते.

* लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते

* दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते.

तारीख / सहयोगी संस्था / पत्ता / वेळ

१ जुलै / रोटरॅक्ट क्लब ऑफ कल्याण सेंट्रल, रोटरॅक्ट क्लब ऑफ बिर्ला कॉलेज / केडीएमसी पार्किंग शिवाजी चौक कल्याण पश्चिम कल्याण रेल्वे स्थानक / ९ ते ४

१ जुलै / रोटरॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली रीजन्सी / रीजन्सी इस्टेट डोंबिवली पूर्व क्लब हाऊस / ९ ते ४

१ जुलै / रोटरॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली क्राऊन सिटी / आयरन जिम डोंबिवली पश्चिम / ९ ते ४

१ जुलै / रोटरॅक्ट क्लब ऑफ कल्याण डायमंड्स / आयकॉन प्लाझा खडक पाडा कल्याण पश्चिम / ९ ते ४

१ जुलै / रोटरॅक्ट क्लब ऑफ अंबरनाथ, रोटरॅक्ट क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटी, रोटरॅक्ट क्लब ऑफ अंबरनाथ पूर्व, रोटरॅक्ट क्लब ऑफ अंबरनाथ उत्तर / रोटरी कम्युनिटी सेंटर अंबरनाथ पूर्व / ९ ते ४

१ जुलै / रोटरॅक्ट क्लब ऑफ एमआयएम / गुरू गुलराज साहेब कुटीया ओ. टी. सेक्शन उल्हासनगर ३ / ९ ते ४

१ जुलै / रोटरॅक्ट क्लब ऑफ सीएचएम कॉलेज उल्हासनगर, रोटरॅक्ट क्लब ऑफ उल्हासनगर / थरीया सिंग दरबार हिरा घाट उल्हासनगर ३ / ९ ते ४

१ जुलै / रोटरॅक्ट क्लब ऑफ ठाणे उत्तर, रोटरॅक्ट क्लब ऑफ ठाणे पूर्व / ठाणे स्थानक पश्चिम / ९ ते ४

१ जुलै / रोटरॅक्ट क्लब ऑफ नवी मुंबई हिलसाइड, रोटरॅक्ट क्लब ऑफ नवी मुंबई सनराइज, रोटरॅक्ट क्लब ऑफ डी. वाय. पाटील आयुर्वेद, रोटरॅक्ट क्लब ऑफ एनएमआयएमएस, रोटरॅक्ट क्लब ऑफ भारती विद्यापीठ सनराइज, रोटरॅक्ट क्लब ऑफ भारती विद्यापीठ बेलापूर / डी. वाय. पाटील हॉस्पिटल नेरूळ नवी मुंबई / ९ ते ४

१ जुलै / रोटरॅक्ट क्लब ऑफ डीवायपीएसबीबी सॅटेलाईट सिटी, रोटरॅक्ट क्लब ऑफ स्मार्ट सिटी नवी मुंबई / डॉ. जितेंद्र विठ्ठल खांडगे किडनी स्पेशालिटी क्लिनिक रूम नं. २०९ दुसरा मजला डॉक्टर हाऊस प्लॉट नं. १०१ नेरूळ पूर्व / ९ ते ४

१ जुलै / रोटरॅक्ट क्लब ऑफ लिंकटाऊन ऐरोली / गुरुद्वारा गुरुनानक दरबार सेक्टर १५, ऐरोली आणि श्री गणेश मंदिर सेक्टर-१९ ऐरोली / ९ ते ४

२ जुलै / विश्वास सामाजिक संस्था, नगरसेवक - संजय वाघुले / कांती विसरिया हॉल गावदेवी ठाणे पश्चिम / ९ ते २

२ जुलै / रोटरॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन युथ / रोटरी हेल्थ केअर सेंटर पाथर्ली रोड डोंबिवली पूर्व / ९ ते ४

२ जुलै / रोटरॅक्ट क्लब ऑफ ठाणे डाऊन टाऊन, रोटरॅक्ट क्लब ऑफ बिल्लाबोंग हाय इंटरनॅशनल स्कूल / ओरियन बिझनेस पार्क कापूरबावडी ठाणे पश्चिम / ९ ते ४

२ जुलै / नारायण मानकर - माजी महापौर / वीर सावरकर नगर आनंद नगर प्लॅटफॉर्म क्र १ वसई पश्चिम / ९ ते ६

२ जुलै / डॉ. मंगला परब / विद्या विहार हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज भाजी गल्ली रेल्वे स्थानकाजवळ विरार पश्चिम / ९ ते ६

२ जुलै / .............../ पतंगशहा कुटीर रुग्णालय जव्हार / ९ ते ६

२ जुलै / मुलुंड जिमखाना / खाशाबा जाधव गार्डन म्हाडा कॉलनी मुलुंड पूर्व / १० ते ३

२ जुलै / ............../ अजीवासन स्टुडिओ सांताक्रूज / १० ते ५

२ जुलै / जिजाऊ एज्युकेशनल अँड सोशल इन्स्टिट्यूट विक्रमगड / प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायत कार्यालय कुडूस / ९ ते ४

२ जुलै / मंदा म्हात्रे / बेलापूर गुरुद्वारा / ............

Web Title: Blood donation camp on behalf of 'Lokmat' from July 1!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.