Join us

वीज कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयांसह रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : थॅलसेमिया, सिकल सेल आणि हिमोफिलियाच्या रुग्णांना रक्ताची गरज असताना रक्तपेढ्या व रुग्णालयांमध्ये रक्ताचा तीव्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : थॅलसेमिया, सिकल सेल आणि हिमोफिलियाच्या रुग्णांना रक्ताची गरज असताना रक्तपेढ्या व रुग्णालयांमध्ये रक्ताचा तीव्र तुटवडा आहे. त्यामुळे या संकट काळात अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कर्मचाऱ्यांनी पुढे येऊन रक्तदान केले आहे. ५ ते १६ जानेवारी या काळात स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन कौन्सिल आणि अदानी फाउंडेशनच्या सहयोगाने कार्यालयांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये डहाणू येथील ५०० मेगावॅट क्षमतेच्या औष्णिक विद्युत प्रकल्पाचाही समावेश होता.

या कठीण काळात सुमारे ६०० कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांसह रक्तदान करण्यासाठी पुढे आले. रक्तदान शिबिर दोन विभागांमध्ये आयोजित करण्यात आले. त्यापैकी एक विभाग शहरातील रक्ताची टंचाई भरून काढण्यासाठी नियमित दात्यांचा होता, तर दुसरा विशेष दात्यांचा विभाग होता. कोविडची लागण झालेल्यांसाठीही विशेष विभाग होता. शिबिरांमध्ये सोशल डिस्टन्सिंग, फेस मास्क लावणे, स्थळाचे निर्जंतुकीकरण आदी उपाय योजले होते. सर्व दात्यांना सेफ्टी कीटस्‌ही देण्यात आले.