Join us

कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यासाठी ‘लोकमत’चा रक्तदानाचा महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:08 AM

मुंबई : कोरोना विरुद्धच्या लढाईत वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी हे आपली महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. परंतु या लढाईत ...

मुंबई : कोरोना विरुद्धच्या लढाईत वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी हे आपली महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. परंतु या लढाईत रक्तदाते देखील रक्तदानासाठी पुढाकार घेऊन आपले मोलाचे योगदान देत आहेत. स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमतच्या वतीने ‘नातं रक्ताचं नातं जिव्हाळ्याचं’ या मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराला मुंबई परिसरातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. रक्ताअभावी कोणत्याही रुग्णाला उपचारात अडचण येऊ नये यासाठी राज्याकडे जास्तीत जास्त रक्तसाठा असणे गरजेचे आहे. यासाठी या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

रक्तदान शिबिराची ठिकाणे

तारीख /उपनगर/ सहयोगी संस्था / पत्ता / वेळ

१३ जुलै - नेरूळ : ठाणे बेलापूर इंडस्ट्रियल असोसिएशन (टी बी आय) / डी. वाय. पाटील हॉस्पिटल, डी. वाय. पाटील ब्लड बँक, सेक्टर ५, नेरूळ, नवी मुंबई / १० ते ४

-----------

१४ जुलै - मुंबई सेंट्रल : श्रीरंग बरगे, सरचिटणीस महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस / मुंबई सेंट्रल आगार, मुंबई / ८ ते २

१४ जुलै - कल्याण (पश्चिम) : रोटरॅक्ट क्लब ऑफ सोफियास् / बालक मंदिर स्कूल, टिळक चौक, कल्याण पश्चिम / ३ ते ६

-------------

१५ जुलै - दादर (पश्चिम) : अखिल भारतीय कीर्तन संस्था, मुंबई डबेवाला संघटना, ज्ञानदा प्रबोधन संस्था, सचिन शिंदे - मुंबई भाजपा सचिव / श्री विठ्ठल मंदिर सभागृह, डी.एल. वैद्य मार्ग दादर पश्चिम / ११ ते ५

येथे संपर्क साधा

‘लोकमत’च्या रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी होणाऱ्या संस्था किंवा संघटनांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी मुंबई महानगर प्रदेशात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी रोनाल्ड डिसोझा यांना ९०८२९९६५८३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

या संकेतस्थळावर नोंदणी करा

http://bit.ly/lokmatblooddonation