महामुंबईत रक्तदान महायज्ञ रक्तदाते जपताहेत रक्ताचे नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:08 AM2021-07-14T04:08:27+5:302021-07-14T04:08:27+5:30

मुंबई : लोकमतच्या वतीने 'नातं रक्ताचं नातं जिव्हाळ्याचं' या मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराला महामुंबई परिसरातील हजारो नागरिक उत्स्फूर्त ...

Blood donation in Mumbai Mahayagya blood donors are protecting blood relations | महामुंबईत रक्तदान महायज्ञ रक्तदाते जपताहेत रक्ताचे नाते

महामुंबईत रक्तदान महायज्ञ रक्तदाते जपताहेत रक्ताचे नाते

Next

मुंबई : लोकमतच्या वतीने 'नातं रक्ताचं नातं जिव्हाळ्याचं' या मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराला महामुंबई परिसरातील हजारो नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. रक्ताअभावी कोणत्याही रुग्णाला उपचारात अडचण येऊ नये यासाठी राज्याकडे जास्तीत जास्त रक्तसाठा असणे गरजेचे आहे. हेच लक्षात घेत कोरोनाविरुद्धच्या लढाईत रक्तदाते रक्तदानासाठी पुढाकार घेऊन आपले मोलाचे योगदान देत आहेत.

स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

रक्तदान शिबिराची ठिकाणे

तारीख /उपनगर/ सहयोगी संस्था / पत्ता / वेळ

१४ जुलै - मुंबई सेंट्रल : श्रीरंग बरगे, सरचिटणीस महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस / मुंबई सेंट्रल आगार, मुंबई / ८ ते २

१४ जुलै - कल्याण (पश्चिम) : रोटरॅक्ट क्लब ऑफ सोफिया'स् / राम मारुती मंदिर हॉल, लाल चौकी कल्याण पश्चिम / ३ ते ६

-------------

१५ जुलै - दादर (पश्चिम) : अखिल भारतीय कीर्तन संस्था, मुंबई डबेवाला संघटना, ज्ञानदा प्रबोधन संस्था, सचिन शिंदे - मुंबई भाजपा सचिव / श्री विठ्ठल मंदिर सभागृह, डी.एल. वैद्य मार्ग दादर पश्चिम / ११ ते ५

१५ जुलै - पेण डोलवी : लोकमत आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड, डोलवी यांच्या संयुक्त विद्यमाने / संजीवनी हॉस्पिटल जेएसडब्ल्यू डोलवी पेण / ९:३० ते ६

--------------

येथे संपर्क साधा 'लोकमत'च्या रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी होणाऱ्या संस्था किंवा संघटनांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी मुंबई महानगर प्रदेशात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी रोनाल्ड डिसोझा यांना ९०८२९९६५८३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

या संकेतस्थळावर नोंदणी करा http://bit.ly/lokmatblooddonation

-------------------------------------

Web Title: Blood donation in Mumbai Mahayagya blood donors are protecting blood relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.