'रक्ताची नाती कधीच संपत नसतात'; धनंजय मुंडेंच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 12:44 PM2022-09-30T12:44:05+5:302022-09-30T12:46:21+5:30

धनंजय मुंडेंच्या या विधानावर आता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

'Blood Realation never end'; This statement has been made by BJP leader Pankaja Munde. | 'रक्ताची नाती कधीच संपत नसतात'; धनंजय मुंडेंच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण

'रक्ताची नाती कधीच संपत नसतात'; धनंजय मुंडेंच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण

Next

मुंबई- राजकीय संघर्षासाठी एकमेकांसमोर उभ्या राहिलेल्या मुंडे बहिण भावांमध्ये देखील बहिण भावाचं नातं राहिलेलं नाही. आम्ही आता राजकीय वैरी आहोत, असं विधान माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे. 

आम्ही राजकारणात एकमेकांचे वैरी आहोत. नाते संबंध हे अगोदर होते. राजकारणामुळे वैर निर्माण झाले. त्यामुळे कुणाच्या वक्तव्यामुळे, वागण्यामुळे काय परिणाम होतात हे ज्याने त्याने आत्मपरिक्षण करावं. हे वारंवार अशाप्रकारची वक्तव्यं येतात ते बरोबर की चुकीचे त्याबाबत आकलन करून मांडावं. ही राजकीय विधाने आहेत. काय बोलायचं हे त्यांनी ठरवावं असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

धनंजय मुंडेंच्या या विधानावर आता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. रक्ताची नाती कधीच संपत नसतात. मी कुणाशीही वैर बाळगत नाही. माझा कुणीही राजकीय शत्रु नाही. मी संबंधित व्यक्तींच्या विचारांसोबत राजकीय तुलना करत असते, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भगवान गडाच्या दसऱ्याची परंपरा ही संतश्रेष्ठ भगवानबाबांनी सुरू केली. स्व.गोपीनाथ मुंडे असेपर्यंत ही परंपरा सुरू होती. आता कुणी मेळाव्याला जायचं कुणाला बोलवायचं. दसरा मेळाव्याला केंद्रीय मंत्र्याला आमंत्रण का दिले नाही ते त्यांनाच विचारा. आम्ही भाऊ-बहीण म्हणून राजकीय विरोधक आहोत. आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांबद्दल काय बोलावं हे ज्याने त्याने ठरवावं. मी त्याबाबत सांगण्यासाठी मी लहान आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं. 

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

'मी जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदीही हरवू शकत नाहीत,' असे वक्तव्य पंकजा मुंडेंनी केले होते. त्यावरून बराच वाद निर्माण झाला. विरोधकांनी या मुद्द्यावरून भाजपाला घेरलं होते. त्यानंतर मोदीजींचा उल्लेख हा सकारात्मक अंगाने केला होता. यात मोदीजींबद्दल कुठेही नकारात्मक उल्लेख केला नाही. मी भाषणातून येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रचलित जात, पात, पैसा या मार्गांऐवजी जनतेच्या हृदयात स्थान मिळवण्याकरीता नविन पद्धतीचे राजकारण करण्याचे आवाहन केले होते. या संदर्भाने मोदीजींचा उल्लेख केला होता, असा पंकजा मुंडे यांनी खुलासा केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: 'Blood Realation never end'; This statement has been made by BJP leader Pankaja Munde.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.