Join us

कलंक पुसला ! सरकारी डॉक्टरवरील बलात्काराचा गुन्हा १८ वर्षांनी रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 7:16 AM

कलंक पुसला : नर्सने केला होता बलात्काराचा आरोप, अखेर सुप्रीम कोर्टाकडून मिळाला न्याय

मुंबई : एका नर्सच्या आरोपावरून नोंदविलेला बलात्काराचा गुन्हा व त्यावरून उभा राहिलेला खटला सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने राज्य सरकारच्या आरोग्य सेवेतील एक डॉक्टर डॉ. ध्रुवराम मुरलीधर सोनार यांना अखेर १८ वर्षांनी न्याय मिळाला आहे. नंदूरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील तोरणमाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्तीवर असताना तेथील एक नर्स राहेल परशी चौधरी हिने दाखल केलेल्या फिर्या दीवरून म्हसवड पोलीस ठाण्यात डॉ. सोनार यांच्याविरुद्ध ६ डिसेंबर २००० रोजी बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता.

पोलिसांनी त्याचा तपास करून शहादा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात १४ जून २००१ रोजी ओरापपत्रही दाखल केले होते. हा गुन्हा रद्द करावा यासाठी डॉ. सोनार यांनी केलेली याचिका यंदा २ जुलै रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (न्या. टी.व्ही. नलावडे व न्या. के. एल. वडाणे) फेटाळली होती. त्याविरुद्ध केलेले अपील सर्वोच्च न्यायालयात न्या. ए. के. सिक्री व न्या. एस. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठाने मंजूर केले व डॉ. सोनार यांच्याविरुद्धचा गुन्हा व दाखल झालेले आरोपपत्रही रद्द करण्याचा आदेश दिला. नाताळाच्या सुटीपूर्वी दिलेले हे निकालपत्र शुक्रवारी उपलब्ध झाले. या प्रकरणात तक्रारदार नर्सच्या पतीचे नोव्हेंबर ९७ मध्ये निधन झाल्यावर दोन मुलांसह ती एकटीच राहात होती. तिचा आरोप असा होता की, डॉ. सोनार यांनी आपल्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे आपण त्यांच्यासोबत पत्नीप्रमाणे राहू लागलो. पण त्यांनी लग्न केले नाही. या सुनावणीत डॉ. सोनार यांच्यासाठी ज्येष्ठ वकील जयंत सूद व अ‍ॅड. संदीप सुधाकर देशमुख यांनी, तक्रारदार नर्ससाठी अ‍ॅड. दीपा कुलकर्णी यांनी तर राज्य सरकारसाठी अ‍ॅड. निशांत कटनेश्वरकर यांनी काम पाहिले.हा बलात्कार का ठरत नाही?फिर्याद खरी मानली तरी डॉ. सोनार यांनी बलात्कार केल्याचे दिसत नाही, असा निष्कर्ष काढताना सर्वोच्च न्यायालयाने पुढील निरीक्षणे नोंदविली...च्तक्रारदार महिलेस कोणाच्या तरी सोबतीची गरज होती. ती डॉक्टरांच्या प्रेमात पडली व डॉक्टरांसोबत राहू लागली.च्दोघांचे असे पती-पत्नीप्रमाणे साहचर्य बराच काळ सुरु राहिले.च्तिने हा निर्णय पूर्ण विचारांती घेतला होता. डॉक्टरांनी बलात्कार केला असे तिचेही म्हणणे नाही.च्डॉक्टरांनी शरीरसुखाच्या लालसेने तिला लग्नाचे खोटे आमिष दाखविले अथवा मानसिक दबाव आणून तिची संमती मिळविली असे कुठेही दिसत नाही.

टॅग्स :बलात्कारमुंबईगुन्हेगारी