हॉटेल, बार सकाळी ७ ते रात्री १ वाजेपर्यंत सुरू; पालिकेची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 04:44 AM2021-02-07T04:44:00+5:302021-02-07T07:49:41+5:30
पालिकेने शनिवारी काढलेल्या सुधारित परिपत्रकानुसार मुंबईत लॉकडाऊ कालावधी २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वाढविला आहे.
मुंबई : पुनश्च हरिओमअंतर्गत मुंबईतील सर्व व्यवहार पूर्वपदावर आणण्यात येत आहेत. याअंतर्गत पालिकेने शनिवारी काढलेल्या सुधारित परिपत्रकानुसार मुंबईत लॉकडाऊ कालावधी २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वाढवला आहे. मात्र सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, फूड कोर्ट व बार यापुढे सकाळी ७ ते रात्री १ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील.
मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाले. काेराेना संसर्ग आता नियंत्रणात आहे. रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.१३ टक्क्यांपर्यंत खाली आला. बाधितांची संख्या ५५० दिवसांनी दुप्पट होत आहे. त्यामुळे पालिकेने हळूहळू सर्व व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार यापुढे मुंबईत हॉटेल, फूड कॉर्नर, रेस्टॅारंट व बार सकाळी ७ ते रात्री १ पर्यंत, तर दुकाने सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. मद्यविक्रीची दुकाने सकाळी १० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत सुरू राहतील.