मुंबई : वारंवार पाठपुरावा करूनही मालमत्ता कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर मुंबई महापालिकेने आता बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. विक्रोळीतील सहा मोटार गॅरेज मालकांनी ४५ लाख ३५ हजार ३५९ रुपयांचा कर थकविल्याने शुक्रवारी त्यांच्या गॅरेजवर जप्तीची कारवाई करण्यात आली. त्यांना दंड भरण्यास पाच दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरही दंड न भरल्यास गॅरेजमधील सामानांचा लिलाव करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पालिकेच्या ‘एस’ विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. हरदीपसिंग धालीवाल यांनी एक लाख ८६ हजार ७०९ रुपये, अवतारसिंग गुरुमितसिंग यांनी दोन लाखावर, अर्जुनसिंग गुरुमितसिंग यांनी सहा लाख चार हजार ८७७ रुपये, सुखविंदर कौर धालीवाल यांनी एक लाख तीन हजार ८४ रुपये, दारासिंग धालीवाल यांनी २७ लाख ८२ हजार ४९२ रुपये, जगतारासिंग गुरुमितसिंग यांनी सहा लाख ४ हजार ८७७ रुपयांचा मालमत्ता कर थकविल्याने त्यांच्या गॅरेजवर कारवाई करण्यात आली.
३ मे रोजीची ‘टॉप टेन’ थकबाकीदारांची यादी-
१) गॅलेक्सी कॉर्पोरेशन (एच पश्चिम विभाग) - १७ कोटी ६८ लाख ६९ हजार १८७ रुपये
२) फोर्टीन गृहनिर्माण संस्था (के पश्चिम विभाग) - १४ कोटी ५८ लाख ९८ हजार ४९५ रुपये
३) विघ्नहर्ता बिल्डर्स अँड प्रोजेक्ट्स (एफ दक्षिण विभाग) - १२ कोटी ८८ लाख ८९ हजार ५७१ रुपये
४) शास्त्रीनगर गृहनिर्माण संस्था (एच पूर्व विभाग) - ११ कोटी ४७ लाख ६५ हजार २५५ रुपये
५) सिद्धार्थ एंटरप्रायझेस (पी उत्तर विभाग) - ०९ कोटी ५० लाख ०२ हजार ६६ रुपये
६) बालाजी शॉपकिपर्स प्रिमायसेस गृहनिर्माण संस्था (एच पूर्व विभाग) - ०९ कोटी ३८ लाख ७५ हजार ८११ रुपये
७) ओंकार रिॲल्टर्स अँड डेव्हलपर्स (पी उत्तर विभाग) - ०९ कोटी ०९ लाख ४० हजार ८४४ रुपये
८) प्रीमियर ऑटो मोबाइल लिमिटेड (एल विभाग) - ०८ कोटी ७५ लाख ४९ हजार ६९३ रुपये
९) कोहिनूर प्लॅनेट कन्स्ट्रक्शन (एल विभाग) - ०७ कोटी ५३ लाख ४६ हजार ५६१ रुपये
१०) दामोदर सुरुच डेव्हलपर्स (आर दक्षिण विभाग) - ०६ कोटी ५७ लाख ७४ हजार ६३५ रुपये