मालमत्ता करात १५ टक्के वाढ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 08:20 AM2022-02-04T08:20:53+5:302022-02-04T08:21:10+5:30

५०० चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या मुंबईतील १६ लाख १४ हजार करदात्यांचा मालमत्ता कर माफ

bmc budget 15 percent increase in property tax | मालमत्ता करात १५ टक्के वाढ?

मालमत्ता करात १५ टक्के वाढ?

Next

मुंबई : ५०० चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या मुंबईतील १६ लाख १४ हजार करदात्यांचा मालमत्ता कर माफ करण्यात आला असला तरी, बाकी मुंबईकरांवर १५ टक्के मालमत्ता करवाढ लादली जाणार आहे.

कोविडमुळे मालमत्ता करात कोणतीही वाढ न करता, सन २०१९-२० प्रमाणेच मालमत्ता कर गोळा केला जात आहे. तसेच भांडवली मूल्याधारित कर प्रणालीच्या विरोधातील याचिकेसंदर्भात अंतिम निर्णय प्रलंबित असल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार करदाते थकबाकीच्या ५० टक्के इतका मालमत्ता कर भरत आहेत. मालमत्ता कर वसुलीमध्ये झालेली घट ही तात्पुरती असून, भविष्यात मालमत्ता करवसुली ही पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा आयुक्त चहल यांनी व्यक्त केली आहे. मात्र मालमत्ता करातून उत्पन्न वाढविण्यासाठी उपाययोजना म्हणून प्रस्तावित असलेल्या भांडवली मूल्यामधील सुधारणांची सन २०२२-२३ पासून पुढील तीन वर्षांकरिता अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात मालमत्ता करवाढीचा बोजा लादला जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

Web Title: bmc budget 15 percent increase in property tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.