कुणाल कामराचा शो झालेल्या हॅबिटेट स्टुडिओमधील बांधकामावर बीएमसीचा हातोडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 19:43 IST2025-03-24T19:40:45+5:302025-03-24T19:43:33+5:30

The Habitat Demolished by BMC: कुणाला कामराचा स्टॅण्डअप कॉमेडी शो झालेल्या द हॅबिटेट स्टुडिओतील बांधकाम मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पाडण्यात आले. 

BMC cracks down on construction at Habitat Studio, where Kunal Kamra's show was held! | कुणाल कामराचा शो झालेल्या हॅबिटेट स्टुडिओमधील बांधकामावर बीएमसीचा हातोडा!

कुणाल कामराचा शो झालेल्या हॅबिटेट स्टुडिओमधील बांधकामावर बीएमसीचा हातोडा!

Kunal Kamra the Habitat Demolished by BMC: स्टॅण्ड कॉमेडियन कुणाल कामराच्या राजकीय व्यंगात्मक कवितेमुळे वाद उफाळला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल रचलेल्या या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी शो झालेल्या स्टुडिओमध्ये जाऊन तोडफोड केली. त्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी द हॅबिटेट स्टुडिओमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

'भोली सी सूरत आँखों में मस्ती' दिल तो तो पागल हैं गाण्यावर कुणाल कामराने राजकीय विडंबन गीत लिहिले आणि ते त्याच्या शो दरम्यान सादर केले. शो मधील या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. 

हेही वाचा >> 'माफी तेव्हाच मागेन, जेव्हा...'; शिंदेंवरील विडंबन गाण्यावर कामराची पहिली प्रतिक्रिया

द हॅबिटेट स्टुडिओतील बांधकाम पाडले

शिंदेंच्या शिवसैनिकांनी खारमध्ये असलेल्या या स्टुडिओमध्ये जाऊन तोडफोड केली. त्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्टुडिओची पाहणी केली. स्टुडिओमध्ये बेकायदेशीर बांधकाम केले गेले असल्याचे आढळून आले. मुंबई महापालिकेच्या पथकाने सोमवारी दुपारी द हॅबिटेट स्टुडिओतील अनिधिकृत बांधकाम पाडले.  

पाडकाम करतानाचा व्हिडीओ

शिवसेनेतील फुटीवर कामराचे गीत

कुणाल कामराने राज्यातील राजकारणात झालेल्या राजकीय घडामोडींचा उल्लेख त्याच्या शोमध्ये केला. शिवसेनेची फूट, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट याचाही उल्लेख त्याने केला. त्यानंतर त्याने एकनाथ शिंदेंना उद्देशून असलेले राजकीय विडंबन गीत सादर केले. 

या गाण्यात शिवसेनेतील फूट आणि गुवाहाटी दौरा याबद्दलचा उल्लेख आहे. हे गाणे व्हायरल झाल्यानंतर शिंदेंची शिवसेना जास्तच आक्रमक झाल्याचे दिसले. तर ठाकरेंच्या शिवसेनेने कुणाल कामराचे समर्थन केले आहे. 

Web Title: BMC cracks down on construction at Habitat Studio, where Kunal Kamra's show was held!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.