मुंबई: दसरा मेळावा शिवाजी पार्कवर कोणाचा होणार यावरुन शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात गेल्या काही दिवसापासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.या दोन्ही गटाकडून शिवाजी पार्कवर परवानगी मिळावी यासाठी अर्ज करण्यात आले होते, आज मुंबई महालिकेने शिवाजी पार्कवर दोन्ही गटांना परवानगी नाकारण्यात आल्याचे पत्र महापालिकेने दिले आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.दसरा मेळाव्यावरुन शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी एक सूचक ट्विट केले आहे.
शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी ट्विट केले आहे.'आतुरता दसरा मेळाव्याची,पुनरावृत्ती होणार', असं ट्विट पेडणेकर यांनी केले आहे. किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनेला प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी शिंदे गटावर आरोप केले आहेत. शिंदे गटाने बीकेसी मध्ये अर्ज केला आणि त्यांना परवानगी मिळाली. पण आम्हाला काहीतरी कारण देऊन तिथे परवानगी नाकारली. आम्हाला महापालिकेने शिवतीर्थवर परवानगी द्यायला हवी होती. हा निव्वळ रडीचा डाव आहे, अशी टीका पेडणेकर यांनी केली आहे.
ना ठाकरेंना, ना शिंदेंना; शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास दोन्ही गटांना परवानगी नाहीच!
'दोन सख्खे भाऊ भांडतील आणि भाजपा ती मजा बघत आहे. आमच्या नेतृत्वाने संयम ठेवला आहे, आणि ते ठेवतील कारण त्यांना रक्तपात नको आहे. आताच्या तरुण शिवसैनिकांना कोणत्याही खटल्यात त्यांना अडकवायचे नाही, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
दोन्ही गटांना परवानगी नाहीच!
मुंबई महापालिकेने शिंदे गटातील नेते आमदार सदा सरवणकर यांना पत्र दिले आहे.' दोन्ही गटाकडून मेळाव्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. पण कोणत्याही एका गटाला ही परवानगी दिली गेल्यास या परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे आम्ही दोन्ही अर्जदारांना परवानगी नाकारत आहोत,असं महापालिकेकडून दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
"अडीच वर्षांत तिघं मिळून मला संपवू शकला नाहीत, यापुढेही संपवता येणार नाही"
शिवसेनेने शिवाजी पार्क मैदान परवानगीवरुन मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेतील ज्येष्ठनेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यामुळे आता शिवसेनेत उभी फूट पडली असल्याचे बोलले जात आहे. आता काही महिन्यातच मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमिवर मुंबईतील राजकीय वातावरण तापू लागले आहे.