BMC Election: मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; जाणून घ्या तुमचा वार्ड कोणासाठी राखीव?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 01:04 PM2022-05-31T13:04:39+5:302022-05-31T13:34:21+5:30

शिवसेना नगरसेवक अमेय घोले, काँग्रेस नगरसेवक माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या वार्डात महिला आरक्षण लागू झाल्यामुळे या नेत्यांची अडचण झाली आहे.

BMC Election: Mumbai Municipal Corporation announces reservation ward; Know for whom your ward is reserved? | BMC Election: मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; जाणून घ्या तुमचा वार्ड कोणासाठी राखीव?

BMC Election: मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; जाणून घ्या तुमचा वार्ड कोणासाठी राखीव?

googlenewsNext

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सर्व इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून राहिलेली महापालिका वार्ड आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत घोषित केली. यात अनेक विद्यमान नगरसेवकांना फटका बसल्याचं दिसून आले आहे. काही वार्डातील आरक्षण सोडतीमुळे विद्यमान नगरसेवकांना दुसऱ्या वार्डाचा पर्याय शोधावा लागणार आहे. 

शिवसेना नगरसेवक अमेय घोले, काँग्रेस नगरसेवक माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या वार्डात महिला आरक्षण लागू झाल्यामुळे या नेत्यांची अडचण झाली आहे. वांद्रे येथील रंगशारदा येथे आरक्षण सोडत काढण्यात आली. यात अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आलेले प्रभाग वार्ड क्रमांक ६०, ८५, १०७, ११९, १३९, १५३, १५७, १६२, १६५, १९०, १९४, २०४, २०८, २१५ आणि २२१ असे आहेत.  तर अनुसूचित जाती महिलांसाठी वार्ड क्रमांक १३९, १९०, १९४, १६५, १०७, ८५, ११९, २०४ राखीव ठेवले आहेत. त्यामुळे या वार्डातील पुरुष नगरसेवकांना दुसरा पर्याय शोधावा लागेल. 

तसेच अनुसूचित जमातीसाठी वॉर्ड ५५ आणि १२४ ( महिला) हे दोन वॉर्ड राखीव ठेवण्यात आले आहेत. महिलांसाठी ५३ वार्ड आरक्षित झाले आहेत. त्यात वार्ड क्रमांक २, १०, २१, २३, २५, ३३, ३४, ४९, ५२, ५४, ५७, ५९, ६१, ८६,९०, ९५, ९८, १००, १०४, १०६, १०९, १११, ११८, १२१, १२२, १२२, १३४, १४४, १४५, १५०, १५६, १५९, १६९, १७०, १७१, १७२, १७५, १७८, १८२, १८४, १८९, १९१, १९२, २०१, २०२, २०५, २०७, २१२, २१३, २१८, २२९, २३० आणि २३६ हे आहेत. 

राज्यातील मुंबई वगळता इतर महापालिका निवडणुकीत प्रभाग रचनेने निवडणुका होणार आहेत. तर मुंबईत वार्ड संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे नवीन वार्ड रचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलं आहे. मुंबईत आता २२७ वार्ड ऐवजी २३६ पर्यंत वार्ड वाढवण्यात आले आहेत. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आरक्षण सोडतीत दिलासा. त्यांचा प्रभाग क्रमांक २०६ हा सर्वसाधारण झाला आहे.माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आरक्षण सोडतीत दिलासा. त्यांचा प्रभाग क्रमांक २०६ हा सर्वसाधारण झाला आहे. बेस्टचे माजी अध्यक्ष आशिष चेंबुरकर यांचे वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचा ११७ क्रमांक वार्ड सर्व साधारण महिला आरक्षित झालाय. माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा ९६ प्रभाग देखील सर्वसाधारण महिला म्हणून आरक्षित झाला. 

मागील निवडणुकीत शिवसेनेने ९१ जागा जिंकल्या होत्या तर भाजपाला ८३ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते. परंतु काही वर्षापूर्वी मनसेच्या ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांचे संख्याबळ ९७ वर पोहचले. यंदाच्या निवडणुकीत ९ नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात ३.८७ टक्के इतकी लोकसंख्या वाढ २००१ ते २०११ या काळात झालेली होती. त्याआधारे २०२१पर्यंतची लोकसंख्या वाढ गृहित धरून नगरसेवक संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे वार्ड पुर्नरचनेत कुणाला फायदा होईल हे निवडणुकीच्या निकालात कळेल.
 

Web Title: BMC Election: Mumbai Municipal Corporation announces reservation ward; Know for whom your ward is reserved?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.