Join us

BMC Election: मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेची विशेष तयारी; मिलिंद नार्वेकरांवर दिलीय जबाबदारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 11:24 AM

मुंबई महापालिकेवर(BMC Election) भगवा फडकत ठेवण्यासाठी प्रमूख विरोधी पक्ष भाजपशी काटे की टक्कर द्यावी लागणार आहे

ठळक मुद्देशिवसेनेला स्पष्ट बहूमत गाठण्यासाठी काही अपक्ष आणि लहान पक्षांच्या नगरसेवकांची मोट बांधावी लागू शकतेआधीही शिवसेनेला मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी गवळी कुटुंबातील दोन नगरसेवकांनी पाठिंबा दिला होताबहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिवसेनेला ११३ नगरसेवकांची गरज

मुंबई – शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचे खासगी स्वीयसहाय्यक मिलिंद नार्वेकर सध्या प्रत्यक्ष राजकीय आखाड्यात उतारल्याचं पाहायला मिळत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने मिलिंद नार्वेकर(Milind Narvekar) मुंबईतील नवरात्रौत्सव मंडळांच्या भेटीगाठी घेत आहेत. परंतु देवीचं दर्शन घेतानाच नार्वेकर मुंबई महापालिकेच्या राजकीय परिस्थितीबाबतही आढावा घेत असल्याचं दिसून येत आहे.

दसरा मेळावापूर्वी शिवसेनेची(Shivsena) मुंबई महापालिकेसाठी मोर्चेबांधणी सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. पुढील वर्षी फेब्रवारी महिन्यात होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने नवरात्र उत्सवाचा मूहुर्त साधत मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेवर(BMC Election) भगवा फडकत ठेवण्यासाठी प्रमूख विरोधी पक्ष भाजपशी काटे की टक्कर द्यावी लागणार आहे. त्यासाठी ११४ हा स्पष्ट बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिवसेना अपक्ष आणि इतर लहान पक्षांना आपल्या पंखाखाली घेण्यास सुरुवात केली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी थेट दगडी चाळीत जाऊन नवरात्र उत्सवातील अंबामातेचं दर्शन घेतलं. याच उत्सवात वंदना गवळी, गीता गवळी आणि प्रदिप गवळी यांच्या सोबत अर्धा तास राजकिय चर्चा केली. त्यानंतर १४४ वाँर्ड मधील टेनामेंट नवरात्र उत्सवात जाऊन संतोषी मातेचं दर्शन घेतलं. यावेळीही आश्विन नाईक आणि अंजली अमर नाईक यांची भेट घेऊन त्यांच्याशीही अर्धातास राजकिय चर्चा केली. या दोन्ही ठिकाणच्या नवरात्र उत्सवात झालेल्या राजकिय गाठीभेटींमुळे शिवसेनेची मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणनिती सुरु झाल्याचं बोललं जात आहे.

शिवसेनेला स्पष्ट बहूमत गाठण्यासाठी काही अपक्ष आणि लहान पक्षांच्या नगरसेवकांची मोट बांधावी लागू शकते. त्यासाठी आता नवरात्र उत्सवापासूनच शिवसेनेचे पडद्यामागचे चाणक्य समजले जाणारे मिलिंद नार्वेकर मोर्चे बांधणीच्या कामाला लागल्याचं दिसून आलं आहे. या आधीही शिवसेनेला मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी गवळी कुटुंबातील दोन नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. आता पन्हा एकदा पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेनेनं मोर्चबांधणी सुरू केल्याची चर्चा आता राजकिय वर्तुळात सुरू झाली आहे.

टॅग्स :शिवसेनामिलिंद नार्वेकरमुंबई महानगरपालिकाउद्धव ठाकरे