Join us

पावसाळी आजार रोखण्यावर पालिकेचा भर; मनपाच्या कीटकनाशक विभागाची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 11:06 AM

मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने पावसाळापूर्व तयारी सुरू केली आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने पावसाळापूर्व तयारी सुरू केली आहे. मुंबईतील विविध ६७ यंत्रणांच्या परिसरातील  २९ हजार १९ पाण्याच्या टाक्यांपैकी २२ हजार ५६८ पाण्याच्या टाक्यांच्या ठिकाणी डास प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली आहे. तर ६ हजार ४५१ पाण्याच्या टाक्यांच्या ठिकाणी उपाययोजना प्रलंबित आहेत.  

टाक्या डास प्रतिबंधक करण्याचे काम ७७.७७ टक्के पूर्ण झाले  आहे, तर २२.२३ टक्के टाक्यांच्या ठिकाणी डास प्रतिबंधक कार्यवाही शिल्लक असल्याची माहिती कीटकनाशक विभागाने दिली. 

पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक करण्याची कार्यवाही १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.  मुंबई शहर परिसरात काही विभाग हे डेंग्यू आणि हिवतापाचे हॉटस्पॉट ठरू शकतात. त्याअनुषंगानेच विभागीय पातळीवर व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून विभागातील संबंधित यंत्रणांना सहभागी करून घ्यावे. विविध यंत्रणा आणि पालिकेच्या संयुक्त मोहिमेतून डास प्रतिबंधात्मक कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामोसमी पाऊसआरोग्य