पालिका दवाखान्यात रुपयाही खर्च करू नका; मुंबईत एप्रिलपासून झीरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 10:12 AM2024-03-08T10:12:28+5:302024-03-08T10:14:34+5:30

एप्रिल महिन्यापासून मुंबईत झीरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी राबविली जाणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी केला.

bmc has announced zero prescription policy for muncipal hospitals start in mumbai from april | पालिका दवाखान्यात रुपयाही खर्च करू नका; मुंबईत एप्रिलपासून झीरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी

पालिका दवाखान्यात रुपयाही खर्च करू नका; मुंबईत एप्रिलपासून झीरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी

मुंबई : काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पालिकेच्या अखत्यारीतील सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये येणाऱ्यांना बाहेरून औषधे विकत घ्यावी लागणार नाहीत, अशी घोषणा केली होती. यासाठी लागणाऱ्या नियोजनासाठी वेळ गेला. आता अंतिमतः एप्रिल महिन्यापासून मुंबईत झीरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी राबविली जाणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी केला. त्यासाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. 

वरळी भागातील महापालिकेच्या वरळी अभियांत्रिकी संकुलाजवळील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मुख्यमंत्र्यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी दवाखान्याची पाहणी करतानाच तपासणीसाठी आलेल्या रुग्णांशीदेखील त्यांनी संवाद साधला. उपचारांवरील खर्च कमी करण्याचा प्रयत्न आहे, आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरू केली असून या मोहिमेतून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. एप्रिलपासून झीरो प्रिस्क्रीप्शन पॉलिसीदेखील सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, डॉ. सुधाकर शिंदे, उपायुक्त  संजय कुऱ्हाडे, उपायुक्त, प्रशांत सपकाळे व अन्य अधिकारी उपस्थित हाेते. 

आतापर्यंत ४२ लाख रुग्णांना लाभ -  माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबईकरांना उपचारासाठी घराजवळच सोय व्हावी या संकल्पनेतून आपला दवाखाना मुंबईत २२६ ठिकाणी सुरू केले आहे. आतापर्यंत ४२ लाख रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. या ठिकाणी उपचार मोफत, कॅशलेस, पेपरलेस मिळत आहेत. मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहिमेतून घरोघरी आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

पालिकेच्या रुग्णालयात आणि दवाखान्यात दररोज विविध भागांतून रुग्ण उपचारासाठी येतात. पालिकेची सायन, नायर, के. ई. एम., कूपर ही मुख्य रुग्णालये आहेत. येथे मोठ्या शस्त्रक्रिया होत असतात. या ठिकाणी ७ हजार १५४ बेड्स आहेत. 

Web Title: bmc has announced zero prescription policy for muncipal hospitals start in mumbai from april

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.