Join us

शिवाजी पार्कातील धूळ उडतच राहणार; नियंत्रणाचा नवा प्रयोगही आणखी लांबणीवर जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 10:13 AM

शिवाजी पार्क मैदानातील धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिका मॅकनाईज पॉवर सक्शन यंत्राचा वापर करणार आहे.

मुंबई : शिवाजी पार्क मैदानातील धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिका  मॅकनाईज पॉवर सक्शन यंत्राचा वापर करणार आहे. या यंत्रासाठी निविदा मागवली होती. मात्र, सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यामुळे निविदा उघडता आली नाही. त्यासाठी आयआयटी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. मात्र, धूळ  रोखण्यासाठीचा प्रस्तावही मंजुरीसाठी निवडणूक आयोगाकडे पाठवावा लागणार आहे. त्यामुळे पार्कातील धूळ नियंत्रण मोहीम आणखी लांबणीवर जाणार आहे. 

धुळीचा प्रश्न निकालात न निघाल्यास लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला होता. 

‘मॅकनाईज्ड पॉवर सक्शन प्रभावी’-

१) पार्काच्या मैदानातील धुळीचा प्रश्न चांगलाच भेडसावू लागला आहे. धूळ नियंत्रणात आणण्यासाठी मध्यतंरी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग करण्यात आला. तसेच मैदानातील गवत वाढवण्याचा प्रयोग केला. 

२) त्याला यश आले नाही. त्यानंतर स्मॉग टॉवरच्या पर्यायाचीही चाचपणी केली. पण त्यातही फारसे काही हाती लागले नाही. त्यामुळे आता मॅकनाईज्ड पॉवर सक्शन या नव्या यंत्राचा वापर केला जाणार आहे. 

३) हे यंत्र अधिक प्रभावी असून त्यामुळे धुळीवर नियंत्रण ठेवता येईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

त्यामुळे पालिका प्रशासन कामाला लागले आहे. मैदानातील धूळ नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने अनेक पर्यायांची चाचपणी केली. पण त्यात यश आले नाही. त्यानंतर मॅकनाईज पॉवर सक्शन यंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

टॅग्स :मुंबईनगर पालिका