Join us

“घंटानाद करा, आणखी काही करा; पण आमचा नाद करू नका”; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 5:03 PM

घंटानाद करा, आणखी काही करा. पण आमचा नाद करू नका, असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आला आहे.

ठळक मुद्देतिसऱ्या कोरोना लाटेचा संभाव्य धोका गृहित धरून सर्व तयारीघंटानाद करा, आणखी काही करा. पण आमचा नाद करू नकामुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा पलटवार

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये अनेकविध विषयांवरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. भाजपसह मनेसही ठाकरे सरकारवर निशाणा साधताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही ठाकरे सरकारने मंदिरे न उघडण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिरे उघडली नाहीत, तर मनसे घंटानाद आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. यावर, घंटानाद करा, आणखी काही करा. पण आमचा नाद करू नका, असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आला आहे. (bmc mayor kishori pednekar replied raj thackeray comment about temple reopen agitation)

“लाखों वर्षांपासूनची सनातन धर्माची परंपरा खंडित होऊ देणार नाही”; भाजपची ठाम भूमिका

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेत ठाकरे सरकावर जोरदार टीका केली. लॅाकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थिती आहे. सर्व गोष्टी सुरू आहेत, मात्र दुसरी, तिसरी लाट सांगत घाबरवले जात आहे. सर्व गोष्टी सुरु असतात मग सणांवरच का येता? तसेच मंदिरे उघडली नाहीत तर मनसे घंटानाद आंदोलन करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. यावर मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी पलटवार करत राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

“शिवसेनेची टीम लूटमार करतेय, ही आहे ठाकरे सरकारची ‘महान’ ११”; भाजपचे टीकास्त्र

आमचा नाद करू नका

घंटानाद करा, नायतर आणखी कसला नाद करा आमचा नाद करू नका. राजकीय पोळ्या भाजून घेणारे आम्ही लोकांच्या भावनेचा विचार करतो, असे दाखवतात. मात्र, भावनेचा नाही तर लोकांच्या जीवाचा विचार करायला हवा. जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो, तेव्हा हे सगळे बीळात जाऊन लपतात, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला. 

“BJP वाल्यांनी शुद्धीत राहून बोलावं, राज्य सरकार केंद्राच्या सूचनेनुसार काम करतंय”

सण आला की लॉकडाऊन

जनआशीर्वाद यात्रा झालेली चालली. सण आला की लॉकडाऊन. म्हणजे सणांमधून रोगराई पसरते. यांना जे हवेय तेवढे वापरायचे आणि बाकीचे बंद करुन इतर जनतेला घाबरून ठेवायचे. त्यामुळे उत्सव साजरा करा, असे सांगितले. लॅाकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थिती आहे. सर्व गोष्टी सुरू आहेत, मात्र दुसरी, तिसरी लाट सांगत घाबरवले जात असून, सर्व गोष्टी सुरु असतात मग सणांवरच का येता? तसेच मंदिरे उघडली नाहीत तर मनसे घंटानाद आंदोलन करणार असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

ED नोटिसीनंतर धावाधाव! अनिल परब घाईघाईत संजय राऊतांच्या भेटीला; १० मिनिटांत माघारी

दरम्यान, मुंबई महापालिकेची तिसऱ्या कोरोना लाटेचा संभाव्य धोका गृहित धरून सर्व तयारी केली आहे. विशेषत: सील इमारती आणि नो मास्क मोहिमेवर आमचे लक्ष असेल. मास्क न घातलेल्यांवर कारवाई तीव्र होणारच आहे. मात्र, हुज्जत घालणाऱ्या, अरेरावी करणाऱ्या क्लीनअप मार्शलविरोधात नागरिकांच्या तक्रारी आल्यास अशा क्लीनअप मार्शलवरही कारवाई होणार आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.  

टॅग्स :राजकारणकिशोरी पेडणेकरराज ठाकरेमनसेशिवसेनामुंबई