Join us

Coronavirus: “मी तसं म्हणालेच नाही”; तिसऱ्या लाटेच्या वक्तव्यावरुन किशोरी पेडणेकरांचा यू-टर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 6:42 PM

Coronavirus: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनाची तिसरी लाट आधीच आलीय, असे मोठे वक्तव्य केले होते.

ठळक मुद्देमुंबईत तिसरी लाट आली आहे, असे म्हटले नव्हतेतिसऱ्या लाटेच्या वक्तव्यावरुन किशोरी पेडणेकरांचा यू-टर्न

मुंबई: कोरोनाची दुसरी लाट बहुतांश प्रमाणात ओसरल्याचे सांगितले जात असले, तरी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे तिसरी लाट आली का, अशी भीती व्यक्त केली जात आहे. देशपातळीवरही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला असून, त्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार पावले उचलताना दिसत आहे. अशातच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनाची तिसरी लाट आधीच आलीय, असे मोठे वक्तव्य मंगळवारी केले होते. आता मात्र किशोरी पेडणेकर यांनी या विधानावरून यू-टर्न घेतला असून, मी असं म्हटलेच नाही. माझ्या विधानाचा विपर्यास केला, असे सांगत सारवासारव केली आहे. (bmc mayor kishori pednekar take u turn over a statement about corona virus third wave in mumbai)

“बेळगावात संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव, मराठी माणसाचा नाही”; फडणवीसांचे प्रत्युत्तर

मी मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आली आहे, असे म्हटले नव्हते. माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. मंत्री नितीन राऊत म्हणाले होते की, नागपुरात तिसरी लाट आली आहे. त्यामुळे तिसरी लाट आपल्या दारावर आली असून, खबरदारी घेणे गरजेचे आहे. तिसरी लाट मुंबईच्या वेशीवर असून पहिल्या दोन लाटांचा अनुभव पाहता, ते थांबवणे आपल्या हातात आहे, असे आता किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. 

मोदी सरकारची ‘या’ कंपनीशी सेटलमेंट; हजारो कोटींच्या मोबदल्यात सर्व खटले घेणार मागे!

कोरोना अजून संपलेला नाही

किशोरी पेडणेकर मंगळवारी म्हणाल्या होत्या की, कोरोनाची तिसरी लाट येणार नसून ती आधीच आली आहे. नागपुरात तर तिसरी लाट आल्याचे मंत्री राऊतांनी म्हटलेय. यानंतर त्यांच्या कार्यालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढून पेडणेकर यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. कोरोना अजून संपलेला नाही, हे आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. आपल्याकडे अद्याप १२ ते १८ या वयोगटासाठी कोरोनाची लस उपलब्ध नाही. अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये कोरोनाचा लहान मुलांना फटका बसला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात तिसरी लाट टाळण्यासाठी आम्ही काम करत आहोत. आपण सर्वांनी करोना नियमांचे पालन केल्यास तिसरी लाट थांबवता येऊ शकते, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्याकिशोरी पेडणेकरशिवसेनानितीन राऊत