मुंबई: अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे. मी मुंबईला येतेय. हिंमत असेल तर रोखून दाखवा, असं आव्हान कंगनानं शिवसेनेला दिलं आहे. यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयानं कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. आता कंगनाच्या कार्यालयाची मुंबई महापालिकेकडून पाहणी करण्यात येत आहे. कंगनाचं पाली हिलमधील कार्यालय अनधिकृत तर नाही ना, याची तपासणी पालिकेनं सुरू केली आहे.अभिनेत्री कंगना राणौतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे. हिंमत असेल तर मला अडवून दाखवा, असं थेट आव्हान तिनं शिवसेनेला दिलं आहे. आज केंद्रानं कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील खारमध्ये कंगनाचं घर आहे. पाली हिल परिसरात तिचं कार्यालय आहे. या कार्यालयाची आज मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली. कार्यालय अनधिकृत नाही ना, रस्त्यावर अतिक्रमण तर झालेलं नाही ना, याची तपासणी करण्यासाठी अधिकारी आले होते.'कंगनासारखे 'उपरे' आणि डिनो, गोमेझ, जॅकलिन, पटानी अस्सल मराठी!' नितेश राणेंचा शिवसेनेला टोलाकंगनाच्या कार्यालयात सध्या रंगरंगोटीचं काम सुरू आहे. त्यांचीही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जुजबी चौकशी केली. कार्यालयाशेजारी असणाऱ्या बंगल्यांचीदेखील पाहणी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी शेजारीच असलेल्या रस्त्यांचीही मापं घेतली. त्यामुळे आता पालिका काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेकडून छ. शिवाजी महाराजांचा अपमान; काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संजय राऊतांना सुनावलंकंगनाला पुरवण्यात आलेल्या सुरक्षेवरून आज महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपाला लक्ष्य केलं. अभिनेत्री कंगना राणौत भाजपच्या पोपट आहेत. त्यामुळेच त्यांना केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्या भविष्यात राज्यसभेत दिसल्यास नवल वाटणार नाही, असं काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.
कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयाची बीएमसीकडून पाहणी; लवकरच होणार कारवाई?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 2:34 PM