कंगनाच्या कार्यालयाबाहेर पालिका कर्मचाऱ्यांसह पोलीस बंदोबस्त; थोड्याच वेळात हातोडा पडणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 11:02 AM2020-09-09T11:02:58+5:302020-09-09T11:37:23+5:30
२४ तासांची मुदत संपल्यानं थोड्याच वेळात कारवाईला सुरुवात
मुंबई: अभिनेत्री कंगना राणौत Kangana Ranauts आणि शिवसेना Shivsena यांच्यात वाकयुद्ध सुरू असताना आता कंगनाचं मुंबईतील कार्यालय महापालिकेच्या BMC रडारवर आहे. काल महापालिका अधिकाऱ्यांनी कंगनाच्या पाली हिलबाहेर नोटीस लावली होती. यानंतर आज तिच्या कार्यालयावर कारवाई होण्याची शक्यता आहे. पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी कंगनाच्या कार्यालयाबाहेर उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत पोलिसदेखील हजर आहेत. त्यामुळे लवकरच कारवाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
कंगनाच्या कार्यालयाबाहेर काल पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नोटीस लावली. कार्यालयात अवैध बांधकाम करण्यात आलं असून रहिवासी भागाचा कार्यालयीन वापर करण्यात आल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं होतं. अधिनियम ३५४ अ अंतर्गत नोटीस लावण्यात आली होती. या नोटिशीची मुदत २४ तास होती. ती आज सकाळी साडे दहा वाजता संपली. त्यामुळे लवकरच पालिकेचे अधिकारी कारवाईला सुरुवात करू शकतात.
कार्यालयावरील कारवाई पुढे ढकलण्याची विनंती कंगनाच्या वतीनं करण्यात आली होती. मात्र ही कारवाई पुढे ढकलण्यास पालिकेनं नकार दिलेला आहे. त्यामुळे कंगनाच्या कार्यालयावर कारवाई होणार हे निश्चित झालेलं आहे. यावरून कंगनानं एका ट्विटच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. 'मी मुंबई दर्शनासाठी तयार आहे. विमानतळाच्या दिशेनं निघाले आहे. महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे गुंड माझ्या कार्यालयाबाहेर जमा झाले आहेत. ते माझं कार्यालय अनधिकृतपणे पाडण्याच्या तयारीत आहेत. मी महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी माझं रक्तही देण्यास तयार आहे. त्यापुढे हे काहीच नाहीच,' असं ट्विट कंगनानं केलं आहे.
As I am all set for Mumbai Darshan on my way to the airport,Maha government and their goons are at my property all set to illegally break it down, go on! I promised to give blood for Maharashtra pride this is nothing take everything but my spirit will only rise higher and higher. pic.twitter.com/6lE9LoKGjq
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
पालिकेच्या नोटिशीत नेमकं काय?
कंगनानं कार्यालयात बांधकाम करताना मुंबई महापालिकेच्या अधिनियम ३५४ अ चं उल्लंघन केल्याचं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पालिकेच्या नोटिशीत सात मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. इमारतीचं बांधकाम पालिकेच्या नियमानुसार झालेलं नाही. दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचं बांधकाम अनधिकृतपणे करण्यात आलं आहे. नकाशात बेडरुमसोबत शौचालयं दाखवण्यात आलं होतं. कागदपत्रांत शौचालयं दाखवण्यात आलेली जागा प्रत्यक्षात मात्र ये-जा करण्यासाठी वापरण्यात आली आहे, असं पालिकेनं नोटिशीत म्हटलं आहे.
"देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंतांच्या राजद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा हरामखोरीच" सामनामधून भाजपाला टोला
पालिकेच्या नोटिशीत एक छायाचित्रदेखील आहे. कार्यालयात कोण कोणता भाग कागदपत्रांनुसार अयोग्य आहे, ते या छायाचित्रात दाखवण्यात आलं आहे. अभिनेत्री जानेवारीत कंगनानं या मालमत्तेचे नुतनीकरण करून तिथे कार्यालय स्थापन केलं. मात्र, या जागेचा निवासी वापर बदलून व्यावसायिक केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आलं आहे. सोमवारी केलेली पाहणी आणि मंजूर आराखड्याच्या आधारे पालिकेचे पथक दोन दिवसांत अहवाल तयार करणार आहे. त्यानंतर लगेचच पुढील कारवाई निश्चित करण्यात येईल, असं पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.
“बात 'हरामखोरीची' निघाली तर 106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेससोबतच सत्तेत बसलात ना?”