CoronaVirus: धारावीसाठी पालिकेचा मोठा निर्णय; कोरोनाला रोखण्यासाठी महत्त्वाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 01:39 PM2020-04-09T13:39:47+5:302020-04-09T13:40:25+5:30

coronavirus गेल्या काही दिवसांपासून धारावीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ

BMC orders ban on all vegetable fruit markets hawkers sellers in Dharavi to curb coronavirus kkg | CoronaVirus: धारावीसाठी पालिकेचा मोठा निर्णय; कोरोनाला रोखण्यासाठी महत्त्वाचं पाऊल

CoronaVirus: धारावीसाठी पालिकेचा मोठा निर्णय; कोरोनाला रोखण्यासाठी महत्त्वाचं पाऊल

Next

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या वेगानं वाढत आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या धारावीत मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यानं आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. धारावीतील लोकसंख्येची घनता अतिशय जास्त असल्यानं कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनं धारावीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 

लॉकडाऊन असतानाही मुंबईतल्या अनेक भागांमध्ये नागरिक रस्त्यावर आहेत. धारावीदेखील याला अपवाद नाही. महापालिका आणि पोलिसांनी वारंवार सूचना देऊन, कारवाई करूनही स्थानिक दाद देत नाहीत. त्यामुळे आता धारावीतील फळ, भाज्यांची दुकानं बंद करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. यासंदर्भात पालिकेच्या जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी शाहू नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना पत्र लिहिलंय. जी-उत्तर विभागातील फळ, भाज्यांची दुकानं, बाजार बंद करा. फेरीवाल्यांना बसू देऊ नका, असं पालिकेनं पत्रात म्हटलं आहे.
 

Web Title: BMC orders ban on all vegetable fruit markets hawkers sellers in Dharavi to curb coronavirus kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.