विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणारच; मुंबई महापालिकेची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 09:27 AM2022-03-24T09:27:59+5:302022-03-24T09:29:37+5:30

आता कोविडचा संसर्ग होत नसल्याने मास्कची आवश्यकता नाही, असाही सूर काहीजण लावत आहेत.

BMC to appoint new agency to fine mask less offenders in public | विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणारच; मुंबई महापालिकेची स्पष्ट भूमिका

विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणारच; मुंबई महापालिकेची स्पष्ट भूमिका

Next

मुंबई :  कोरोनाचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आल्याने सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आता कोविडचा संसर्ग होत नसल्याने मास्कची आवश्यकता नाही, असाही सूर काहीजण लावत आहेत. मात्र, विनामास्क फिरणाऱ्या लोकांवरील कारवाई बंद करण्याचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

क्लिनअप मार्शलकडून होणारी कारवाई दंडात्मक कारवाई बंद करून यापुढे नवी एजन्सी नेमली जाणार आहे. तसेच ३१ मार्च २०२२ पर्यंत नव्या एजन्सीमार्फत कारवाई सुरू न झाल्यास पालिकेचे कर्मचारी ही कारवाई करणार आहेत. 
 

Web Title: BMC to appoint new agency to fine mask less offenders in public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.