मुंबई : कोरोनाचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आल्याने सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आता कोविडचा संसर्ग होत नसल्याने मास्कची आवश्यकता नाही, असाही सूर काहीजण लावत आहेत. मात्र, विनामास्क फिरणाऱ्या लोकांवरील कारवाई बंद करण्याचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. क्लिनअप मार्शलकडून होणारी कारवाई दंडात्मक कारवाई बंद करून यापुढे नवी एजन्सी नेमली जाणार आहे. तसेच ३१ मार्च २०२२ पर्यंत नव्या एजन्सीमार्फत कारवाई सुरू न झाल्यास पालिकेचे कर्मचारी ही कारवाई करणार आहेत.
विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणारच; मुंबई महापालिकेची स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 9:27 AM