Breaking: मुंबईत गॅस वायूगळतीची तक्रार, अग्निशमनच्या १३ गाड्या घटनास्थळावर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 12:41 AM2020-06-07T00:41:49+5:302020-06-07T00:43:58+5:30
मुंबई महापालिकेने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली असून संबंधित घटनास्थळावर १३ अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत.
मुंबई - कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असतानाच, मुंबईतील चेम्बुर परिसरातील काही कंपन्यांमध्ये गॅस वायू लिकेजची घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. चेंबुर, घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि पवई भागातील काही कंपन्यांमधून गॅस लिकेज झाल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात गॅसचा दुर्गंध पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, मुंबई महापालिकेने घाबरु नका, व इतरांनाही घाबरवू नका, असे म्हटले आहे.
We have received a couple of complaints of suspected gas leak, from residents in Chembur, Ghatkopar, Kanjurmarg, Vikhroli & Powai. The fire brigade is checking and we will update facts soon.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 6, 2020
मुंबई महापालिकेने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली असून संबंधित घटनास्थळावर १३ अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत. सध्या फायर ब्रिगेडकडून घटनास्थळावर पाहणी व नियंत्रण ठेवण्याचे काम सुरु आहे. काही लोकांना दुर्गंध येत आहे, त्यांनी काही काळासाठी नाकावर, तोंडावर टॉवेल किंवा कपडा ठेऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.
चेंबूर, घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि पवई परिसरात वायू गॅस गळती सदृश्य वास येत असल्याच्या काही तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. मुंबई अग्निशमन दल या संशयित गळतीचा शोध घेत आहे. योग्य माहिती मिळाल्यानंतर कळविण्यात येईल. #MyBMCUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 6, 2020