मुंबई - कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असतानाच, मुंबईतील चेम्बुर परिसरातील काही कंपन्यांमध्ये गॅस वायू लिकेजची घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. चेंबुर, घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि पवई भागातील काही कंपन्यांमधून गॅस लिकेज झाल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात गॅसचा दुर्गंध पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, मुंबई महापालिकेने घाबरु नका, व इतरांनाही घाबरवू नका, असे म्हटले आहे.
मुंबई महापालिकेने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली असून संबंधित घटनास्थळावर १३ अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत. सध्या फायर ब्रिगेडकडून घटनास्थळावर पाहणी व नियंत्रण ठेवण्याचे काम सुरु आहे. काही लोकांना दुर्गंध येत आहे, त्यांनी काही काळासाठी नाकावर, तोंडावर टॉवेल किंवा कपडा ठेऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.