Join us

मढ-कोळीवाड्यात नौका बुडाली; ५ खलाशी वाचले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 6:04 AM

‘आई वेलंकणी’ नावची नौका किनाऱ्यावर परतत असताना बुडल्याची दुर्घटना बुधवारी सकाळी घडली.नौकेतील पाचही खलाशी वाचले आहेत.

मुंबई : मढ जवळील समुद्रात ‘आई वेलंकणी’ नावची नौका किनाऱ्यावर परतत असताना बुडल्याची दुर्घटना बुधवारी सकाळी घडली.नौकेतील पाचही खलाशी वाचले आहेत.मढ-कोळीवाड्यातील मढ मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सभासद विष्णू लक्ष्मण कोळी यांची ‘आई वेलंकणी’ नावाची मासेमारी नौका मासेमारी करून सकाळी बुधवारी ११.३० वाजता परत किनारी येत होती. त्यावेळी या नौकेचा जोराने आलेल्या वाºयाने नांगर खचला व तिथेच पाण्याखाली असलेल्या खडकावर जाऊन आदळली. त्यामुळे नौकेला भगदाड पडून ही नौका बुडाली.नौका बुडली असली तरी सुदैवाने या नौकेत असलेले ५ खलाशी सुखरूप बचावले आहेत. ही घटना कळताच मढ ग्रामस्थांनी तात्काळ तेथे धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने बुडालेल्या या नौकेला अथक प्रयत्नांतनी बाहेर काढण्यात आले, अशी माहिती भारतीय मच्छीमार काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी संतोष कोळी यांनी दिली.