Join us

बेपत्ता कोरोनाबाधित आजोबांचा मृतदेह १४ दिवस शवागृहातच पडून

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 6:29 AM

केईएम रुग्णालयातील प्रकार; क्रमांकाची अदलाबदल झाल्याचे उघड

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केईएम रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या आजोबांचा अखेर १४ दिवसांनी शोध लागला. धक्कादायक बाब म्हणजे २० तारखेला पहाटेच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतदेहावरील क्रमांकाच्या चुकीमुळे ते बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले. कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर, त्यांचा मृतदेह १४ दिवस शवागृहातच पडून असल्याचे समोर आले.

काळाचौकी परिसरात ७० वर्षीय आजोबा कुटुंबासह राहतात. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्या घणसोलीला राहणाऱ्या जावयाने दिलेल्या माहितीनुसार, १४ मे रोजी त्यांना केईएम रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच १६ तारखेपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. १९ तारखेला ते रुग्णालयातून नाहीसे झाल्याचा त्यांना कॉल आला.

त्यांचा शोध न लागल्याने २५ मे रोजी कुटुंबीयांनी भोईवाडा पोलिसांत तक्रार दिली. बरीच शोधाशोध केरूानंतर भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद कांबळे यांनी स्वत: रुग्णालयात जाऊन चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासले, मात्र त्यात आजोबा बाहेर जाताना दिसले नाहीत. पोलिसांनी अखेर मृतदेहाच्या नोंदणीतून तपास सुरू केला. मंगळवारी शवागृहातून आजोबांचा मृतदेह सापडला. तो आजोबांचा असल्याची ओळख पटली.

पोलिसांमुळे किमान अंतिम दर्शन घडलेसासरे बेपत्ता झाल्याने घरातल्यांची झोप उडाली होती. वेड्यासारखा त्यांचा शोध घेत होतो. अखेर, पोलिसांमुळे किमान त्यांचे अंतिम दर्शन तरी झाले. रुग्णालयालाही काय दोष देणार? तिथे खूप सारे मृतदेह पडून होते.- आजोबांचे जावई

टॅग्स :केईएम रुग्णालयमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस