मुंबई - शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी निघालेल्या ताफ्यातील एका बोटीचा अपघात आज सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास झाला. या अपघातग्रस्त बोटीमधून बेपत्ता झालेल्या सिद्धेश पवारचा मृतदेह सापडला असून अतिशय खेदाची गोष्ट म्हणजे या तरूणाचे चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. पेशाने सिद्धेश सी.ए. होता. त्यामुळे सिद्धेशच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. सिद्धेश रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गुणदे या गावचा आहे.
लहानपणापासून मुंबईत राहिलेल्या सिद्धेश आपल्या मामांबरोबर शिवस्मारकाच्या शुभारंभ सोहळ्यासाठी गेला होता. त्यातील एका स्पीड बोटीमधून तो प्रवास करीत होता. दुर्दैवाने या बोटीचा अपघात झाला. अपघातानंतर ३ पैकी २ जणांना वाचविण्यात आले असून सिद्धेश मात्र बेपत्ता झाला होता. नौदलाच्या रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान चार तासांनी सिद्धेश पवारचा मृतदेह अपघातग्रस्त बोटीतच आढळून आला.
शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमास निघालेल्या स्पीडबोटीला अपघात, बोटीत होते 25 जण