Join us

दीड तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर मृतदेह उतरविला खाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:06 AM

जाेगेश्वरीतील घटना; होर्डिंग्जवर गळफास घेत आत्महत्यालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जोगेश्वरीत होर्डिंग्जला गळफास घेत एका ३० वर्षीय तरुणाने ...

जाेगेश्वरीतील घटना; होर्डिंग्जवर गळफास घेत आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जोगेश्वरीत होर्डिंग्जला गळफास घेत एका ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी ही बाब समजल्यानंतर अग्निशमन दल आणि अंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर तो मृतदेह खाली उतरविण्यात त्यांना यश आले. या प्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली.

जोगेश्वरीतील एका मोठ्या होर्डिंग्जवर एक व्यक्ती लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मंगळवारी सकाळी १०च्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. होर्डिंग्जच्या मागच्या बाजूला असलेल्या स्टॅण्डला या तरुणाने गळफास घेतल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर फायर ट्रकच्या मदतीने सदर व्यक्तीला साडेअकराच्या सुमारास खाली उतरवले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानुसार त्याचा मृतदेह स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

अंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्हटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत सदर व्यक्तीची ओळख पटली असून रामकुमार असे त्याचे नाव हाेते. साधारण २५ ते ३० वर्षांचा रामकुमार बिगारी काम करीत हाेता. त्याच्या कुटुंबीयांना याबाबत कळविण्यात आले असून त्यांचा जबाब नोंदविला जाईल. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजेल, असे पाेलिसांनी सांगितले.

..........................