डिप्पी वांकाणी - मुंबई
जम्मू-काश्मीर आणि झारखंड या राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी बुकींनी (सट्टेबाजांनी) बेटिंगचे (सट्टय़ाचे) दर जाहीर केले आहेत. या निवडणुकांदरम्यान सट्टाबाजारात सुमारे 15,क्क्क् कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा त्यांचा अंदाज आहे. तसेच नुकत्याच झालेल्या काही राज्यांच्या विधानसभा आणि त्यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत दिसलेली नरेंद्र मोदी लाट या राज्यांमध्ये तितकी प्रभावी दिसणार नाही. भारतीय जनता पार्टीला जम्मू-काश्मीरमध्ये पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) या पक्षांच्या कडव्या विरोधाला सामोरे जावे लागेल, असे भाकित बुकींनी वर्तवले आहे.
त्याशिवाय जम्मू-काश्मीरमधील थंडी आणि पर्वतमय भूभागामुळे मतदानाची टक्केवारी घसरेल. तेथे मोदींचा करिष्मा फारसा चालणार नाही. भाजपा फारतर लेह, लड्डाख आणि जम्मू विभागांत काहीसे यश मिळवू शकेल, असा अंदाजही बुकींनी लावला.
आम्ही शक्यतो या राज्यांमध्ये सट्टा लावत नाही. यावेळी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीवेळी सट्टा लावला नव्हता. त्यामुळे आता या दोन राज्यांत अपवाद म्हणून बेटिंग करावे, असे पंटर्सचे मत असल्याचे बुकींनी सांगितले.